शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दहिवडी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप जाधव यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

म्हसवड : दहिवडी येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे यांचे खंदे समर्थक दिलीप परशुराम जाधव यांची ...

म्हसवड : दहिवडी येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे यांचे खंदे समर्थक दिलीप परशुराम जाधव यांची निवड करण्यात आली. चेअरमनपद मिळविण्यासाठी विरोधकांनी सदस्य फोडाफोडीची राजकीय खेळी केल्यानंतर शेखर गोरे यांनी यात लक्ष घातले होते. विरोधकांच्या या खेळीला शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत सदस्यांनी चपराक देत विरोधकांच्या प्रयत्नांना यश मिळू दिले नाही.

दहिवडी येथील विविध सहकारी सेवा सोसायटी शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे यांच्या विचारांची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते. आजपर्यंत त्यांच्याच समर्थकांची चेअरमनपदी निवड होत असताना या वेळी विरोधकांनी सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी व चेअरमनपद मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शेखर गोरेंच्या निष्ठावंत सदस्यांनी विरोधकांच्या प्रयत्नांना यश मिळू दिले नाही.

चेअरमन निवडी प्रसंगी व्हाईस चेअरमन शैलेंद्र खरात, मारुती गलंडे, राजू खांडे,रवींद्र जाधव, जयंत कुबेर, शिवाजी जाधव, शामराव नाळे, सुरेश इंगळे, निर्मला जाधव, बजरंग जगदाळे हे संचालक तसेच पंढरीनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, नगरसेवक प्रशांत शिंदे, विजय जाधव, अमोल जाधव, गोरख जाधव, निलेश जाधव, पांडुरंग जाधव उपस्थित होते.

चेअरमनपदी दिलीप जाधव यांची निवड झाल्याबद्दल शेखर गोरे यांनी कौतुक केले.

चौकट

जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आपल्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विविध सत्ता मिळविल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेतेमंडळी व त्यांचे कार्यकर्ते नेहमीच आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात पटाईत असल्याने सत्ता हडपण्यासाठी ते आसुसलेले दिसून येत आहेत. दहिवडी सोसायटीत त्यांचे फोडाफोडीचे प्रयत्न आपल्या निष्ठावंत सदस्यांनी हाणून पाडले आहेत. राष्ट्रवादीच्या या मागून वार करण्याच्या प्रवृत्तीविरोधात येणाऱ्या निवडणुकांत त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे.

- शेखर गोरे

फोटो

दहिवडी सोसायटीच्या चेअरमनपदी शेखर गोरे समर्थक दिलीप जाधव यांची निवड करण्यात आली.

===Photopath===

180621\img-20210617-wa0043.jpg

===Caption===

फोटो - दहिवडी ता.माण सोसायटीच्या चेअरमनपदी शेखरभाऊ गोरे समर्थक दिलीप जाधव यांची निवड झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व संचालक व कार्यकर्ते