शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या दिसला? ठिकाण सांगू नका!

By admin | Updated: February 20, 2015 23:10 IST

पोलीस अधीक्षकांचे आवाहन : ‘टायगर सेल’च्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा : बिबट्या किंवा कोणत्याही वन्यजीवाचे दर्शन झाल्यास, ते ठिकाण कोणत्याही माध्यमातून सार्वजनिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. अशा प्रकारातून शिकारी, तस्कर सावध होतात आणि वन्यजीवांची शिकार वाढते, हे ओळखून दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.जिल्हा व्याघ्रसंरक्षण कक्ष (टायगर सेल) च्या बैठकीत डॉ. देशमुख मार्गदर्शन करीत होते. उपवनसंरक्षक (वन्यजीव) एम. एम. पंडितराव, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक (फिरते पथक) नीता डेरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, रोहन भाटे यांच्यासह वीजवितरण कंपनीचे अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यातील वाघ आणि अन्य वन्यजीवांच्या हालचालींवर देखरेख, माहिती संकलन आणि संवर्धन यासाठी ‘टायगर सेल’ कार्यरत असतो. पोलीस अधीक्षक या कक्षाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. वन्यजीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी या कक्षाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. याही बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि सूचनाही करण्यात आल्या. बिबटे मानवी वस्त्यांच्या जवळपास मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि अन्य माध्यमांतून त्यांची छायाचित्रेही फिरू लागली आहेत. मात्र, बिबट्या किंवा अन्य कोणताही वन्यजीव नेमका कोठे दिसला, याची माहिती गुप्त राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असून, त्याचे ठिकाण सांगितल्यास शिकारी आणि तस्कर सावध होतात. त्यामुळे वन्यजीवाचे वास्तव्य असलेले ठिकाण प्रसिद्ध करणे टाळावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.वन्यजीवांच्या रक्षणार्थ संवेदनशीलता निर्माण करण्याच्या दृष्टीने तलाठी, ग्रामसेवक, मुलकी कर्मचारी, पोलिसांसाठी कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिकार रोखण्यासाठी गावपातळीवर फळी निर्माण होणार आहे. शिकारी, तस्कर किंवा संशयास्पद व्यक्तींबाबत माहितीची देवाणघेवाण तत्परतेने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. शस्त्र परवान्यातील अनियमितता तपासाव्यात, गावठी बाँबच्या साह्याने शिकार करणाऱ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. (प्रतिनिधी)तात्पुरते तपासणी नाकेजिल्ह्यातील पर्यटनस्थळी वाढत असलेली गर्दी विचारात घेता वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त सहभागातून पर्यटनाच्या हंगामात तात्पुरते तपासणी नाके उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. कास, ठोसेघर, ओझर्डे धबधबा, क्षेत्र महाबळेश्वर, कोयना अशा ठिकाणी हे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.