शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST

आदर्की : पाटण, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला, तर फलटण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे ...

आदर्की : पाटण, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला, तर फलटण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे नदीला वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे फलटण तालुक्यात सोडण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत धरण व्यवस्थापनाने धोम-बलकवडी कालव्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात यंदा पावसाने तांडव घातले. गेल्या अनेक दशकांत झाला नाही असा पाऊस जुलै महिन्यात झाला अन‌् नद्यांना महापूर आला. धोम, धोम-बलकवडी धरणे भरल्यानंतर धरणातील पाण्याचा नदीत विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला. हेच पाणी नदीत सोडण्याऐवजी धोम-बलकवडी कालव्यात सोडल्यास फलटण तालुक्यात दुष्काळी तालुक्याला मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून केली जात होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत मंगळवारी धाेम-बलकवडी कालव्यात पाणी सोडण्यात आले अन‌् शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

फलटण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, घेवडा, पावटा आदी पिके धोक्यात आली होती. तर पाण्याअभावी ऊसाच्या लागणी रखडल्या होत्या. विहिरीचे पाणी कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकटही निर्माण झाले होते. मात्र, आता कालव्यात पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

(कोट)

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला धोधो पाऊस पडतो. मात्र, पूर्व भागातील फलटण तालुक्यात पावसाचा एकही थेंब नसतो. कालव्यात पाणी सोडल्याने आता खरीप हंगामातील पिकांना उभारी मिळणार आहे.

- संतोष शिंदे, माजी उपसरपंच कोऱ्हाले

फोटो : १० धोम-बलकवडी

धोम धरणातून मंगळवारी धोम-बलकवडी उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)