शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात शनिवारी ‘ढोल महोत्सव’

By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST

गांधी मैदान : सातारकरांसाठी खास पर्वणीचे आयोेजन

सातारा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात निघालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे गोडवे आजही सातारा शहरात गायले जात आहेत. याच सातारवासीयांसाठी ‘गंधतारा ढोल्स’च्या वतीने शनिवारी ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विधायक पत्रकारितेचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने डॉल्बी सिस्टीम बंदीचा नारा दिला. त्याविषयी सुमारे एक वर्षे प्रशासकीय, गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांचा पाठपुरावाही ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आला. त्यातून तयार झालेल्या एल्गाराने यंदा डॉल्बी सिस्टीमचा आवाज सातारा जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे सुखावह चित्र पहायला मिळाले. विधायक कामात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक युवकांनी स्वत: पुढाकार घेऊन काही ढोल पथकांची स्थापना केली. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण या रगाड्यात असलेल्या तरुणाईने रोज ढोलाच्या सरावासाठी चार तास काढले. त्यांच्या या कष्टाचे फळ सातारकरांच्या चेहऱ्यावरून पहायला मिळाले. कित्येक दशकांनी अनेक ज्येष्ठांचे पाय चक्क विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने वळालेलेही पहायला मिळाले.सातारकरांचे अलोट प्रेम आणि पारंपरिक वाद्यांप्रती असलेल्या निष्ठेपायी ‘गंधतारा ढोल्स’च्या वतीने शनिवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी मैदान येथे ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विसर्जन मिरवणूक चुकलेले आणि पुन्हा एकदा ढोलांच्या वातावरणाचा आनंद देण्यासाठी ‘गंधतारा’चा ताफा ढोल वाजवणार आहे. रसिक सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ व ‘गंधतारा’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)