शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

देसाई-पाटणकरांचा पैसा लागला खुळखुळू!

By admin | Updated: August 23, 2014 23:47 IST

उध्दव ठाकरेंची सभा : पन्नास लाखांचा हिशोब म्हणे डोळे विस्फारणारा

पाटण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तालुक्यात आणून त्यांच्यासमोरच शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ’माझा पराभव जनतेने नाही तर विक्रमसिंह पाटणकरांच्या धनशक्तीने केला.’ यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपली मते विकू नका, गतवेळेपेक्षा आता चौपट भाव होईल.’ या आरोपवर लगेचच आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पत्रक काढून ‘शंभूराज देसाई यांनी एक दिवसात ५० लाखांहून अधिक चुराडा केला. एवढा पैसा कुठून आणला ते जाहीर करावे,’ अशी टीका केल्यामुळे पाटण तालुक्याचे राजकारण आता देसाई-पाटणकर यांच्या संपत्तीपर्यंत येऊन ठेपले आहे. पाटण तालुक्यातील राजकारण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. परिणामी येथील राजकीय पटलावर कोणतीही घटना घडलीतरी त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. पाटण तालुक्याचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेभोवतीच फिरते. २००९ च्या निवडणुकीत ५८० मतांनी पराभव झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसांपासून शंभूराज देसाई यांनी आजअखेर नेहमीच पाटणकरांच्या धनशक्तीने माझा पराभव केल्याची ओरड करत आले आहेत. पाटणकरांनी कोयना अ‍ॅग्रो, सकस यासारखे खासगी उद्योग काढून स्वत:चा फायदा करून घेतला. तालुक्यातील तरुणांसाठी एक सार्वजनिक उद्योग उभा केला का ? असा सवाल शंभूराज देसाई नेहमीच करतात तर देसाई कारखाना वगळता एकसुद्धा उद्योग निर्मिती देसार्इंना करता आली नाही, मग उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी एवढा पैसा कुठून आला असे कोणते उद्याग व्यवसाय त्यांनी उभे केले हे जाहीर करावे, असे आव्हान करून विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रथमच देसार्इंच्या विरोधात एवढी आक्रमक भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर मरळी येथील कार्यक्रमावर जो पैसा खर्च केला तोच पैसा जर ऊस उत्पादकांना दिला असता तर शेतकऱ्यांना आनंद झाला असता. शेकडो दुचाकींची रॅली ५०० हून अधिक वाहने, भव्य मंडप हे प्रदर्शन दाखविण्याचा मोह देसार्इंना टाळता आला नाही. मात्र, दुसरीकडे कारखान्याच्या कामगारांचा पगार देणे असलेली थकबाकी असे असताना राजकारणासाठी कोट्यवधींचा खर्च कशाचे द्योतक आहे,’ अशी टीका आता पाटण तालुक्यातून होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)वाद नेहमीचाच..!राजकारणाचा विचार करता गेल्या काही दिवसांत पाटण तालुका नेहमीच संघर्षमय बनला आहे. पाटण तालुक्यात कोणताही वाद असलातरी तो राजकीयच असतो, ही बाब लपून राहिलेली नाही. परिणामी यामध्ये आपोआपच आ. विक्रमसिंह पाटणकर आणि माजी आ. शंभूराज देसाई येतात. ग्रामीण भागात वाद झाला तरी तो आमदार पाटणकर आणि माजी आमदार देसाई गटाशीच जोडला जात आहे.