शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी

By admin | Updated: June 13, 2015 00:26 IST

पाटण पंचायत समिती सभा : बैठकीची वेळ बदलल्याचे झाले निमित्त; प्रोसिडिंगवरूनही गदारोळ

पाटण : पंचायत समितीची मासिक सभा सकाळी अकरा वाजता असल्याचे नोटीस सर्व सदस्यांना पाठविले. त्यानुसार उपसभापतींसह देसाई गटाचे सर्व सदस्य हजर होते. तर पाटणकर गटाचे सर्व सदस्य सभापतींसह दुपारी सव्वा एक वाजता बैठकीस आले. त्यामुळे ताटकळत बसलेल्या देसाई गटाच्या सदस्यांचा चांगलाच पारा चढला होता. मात्र, बैठकीच्या दोन दिवस अगोदर दुपारी १ वाजता सभा असल्याची दुरुस्ती करण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले. या विषयावरून देसाई-पाटणकर गटांतील सदस्यांमध्ये चांगलाच गदारोळ झाला. दरम्यान, चाफळ येथे झालेल्या बैठकीकडे चर्चेनुसार प्रोसिडिंग लिहिले नसल्याच्या कारणावरूनही बराचकाळ खडाजंगी उडाली.पाटणकर गटाच्या सदस्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सभापती संगीता गुरव देखील आल्या नव्हत्या. त्यातच सकाळी अकरा वाजताची मीटिंग असल्याचे समजून देसाई गटाचे सर्व सदस्य बराचवेळ ताटकळत बसले होते. त्यामुळे उपसभापतींनी गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांना धारेवर धरत एक वाजून दहा मिनिटे झाली तरी पाटणकर गटाचे सदस्य आलेले नाहीत. ‘सभापतींना वेळ पाळता येत नसेल तर हे तालुक्याचे दुर्दैव्य आहे. तुम्ही मीटिंग चालू करा; अन्यथा आमच्या प्रोसिडिंगरवर सह्या घ्या, आम्ही निघून जातो,’ असा पवित्रा घेतला. सदस्य विजय पवार देखील चांगलेच संतापले. त्यानंतर सभापतींसह सर्व सदस्य सभागृहात आले. आणि पुन्हा खडाजंगी सुरू झाली.त्यावर राजाभाऊ शेलार व राजेश पवार यांनी पुन्हा असे होणार नाही, उपसभापतींना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सभेतील वादावर पडदा पडला. ‘पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळांना आय. एस. ओ. मानांकन दर्जा मिळाला पाहिजे,’ असे लाहोटी म्हणाले. आरोग्य विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २६ पथके कार्यरत केली असून, सर्पदंश आणि श्वानदंशाच्या लसी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध ठेवल्याचे सांगण्यात आले. तर केरळ व मुरूड आरोग्य केंद्रात एक डॉक्टर कार्यरत असल्याचा मुद्दाही चर्चेला गेला. (प्रतिनिधी)जरा याद करो कुर्बानी...मासिक सभेत दरवेळी श्रद्धांजली व अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला जातो. मात्र, या मासिक सभेत असा कोणताच ठराव मांडण्यात आला नाही. मनीपूर येथे दहशतवादी हल्ल्यात अठरा जवान शहीद झाले होते. त्या जवानांची आठवण झाली नाही.