शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी

By admin | Updated: March 4, 2016 00:59 IST

पाटण पंचायत समिती : नरेंद्र पाटील यांच्या बैठकीत आमदार गटाच्या सदस्यांचा सभात्याग

पाटण : विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात बोलविलेल्या बैठकीत आमदार शंभूराज देसाई गटाच्या उपसभापती व इतर पंचायत समिती सदस्यांनी आम्हाला तालुक्याच्या पाणी टंचाई आढावा बैठकीला का बोलविले नाही? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे देसाई-पाटणकर गटात जोरदार खडाजंगी झाली.दरम्यान, विधानपरिषदेच्या आमदारांना बैठक घेता येते असा जीआर आहे का? असा सवाल ही उपस्थित झाला. त्यावर आमदार पाटील व गटविकास अधिकारी एस. के. गौतम यांनी ही पाणी टंचाई बैठक केवळ अधिकाऱ्यांची असून, पदाधिकाऱ्यांना बोलविले नव्हते, असे सांगितले. तर जीआर बघावयाचा असेल तर मंत्रालयात जा असे आमदारांनी सुनावले. त्यावर समाधान न झाल्यामुळे आ. देसाई गटाच्या सदस्यांनी सभा सुरू होताच सभात्याग केला. गुरुवारी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाणी टंचाई आढावा बैठक सुरू करतानाच आमदार देसाई गटाचे उपसभापती व सदस्य हजर राहिल्याचे ओळखले. त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, मी आमदार आहे. आणि ढेबेवाडी माझे गाव आहे. मी तालुक्यातीलच असल्यामुळे मला अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे. त्यानंतर उपसभापती डी. आर. पाटील यांनी हस्तक्षेप करत गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठकीबाबत आम्हाला का कळविले नाही. याबाबत लगेचच आमदारांनी सांगितले की, तुम्ही नंतर बैठक घ्या आणि सभापती, ‘बीडीओ’ना विचारा या बैठकीत व्यत्यय आणू नका. अधिकाऱ्यांनी प्रथम मला सांगावे की, माजी आमदार पाटणकर यांनी आमदार असताना शेवटच्या १ वर्षात मंजूर केलेल्या कामांचे स्पष्टीकरण द्यावे. मी आता राष्ट्रवादीची बैठक लावलेली नाही. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आढावा घेत आहे. त्यानंतर आ. देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील, सदस्य विजय पवार, नथूराम कुंभार, रघुनाथ माटेकर, सुमन जाधव आणि विजया देसाई हे बैठकीतून उठून गेले. त्यानंतर बैठकीत पाणीटंचाईचा आढावा झाला. यावेळी सभापती संगीता गुरव, सत्यजित पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार, शोभा कदम, राजाभाऊ काळे, सुभाष पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांच्या घरात राहायला येऊतालुक्यातील पाणी टंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचे जाणवत आहे. एकूण ७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असूनही अद्याप टँकर सुरू नाहीत. अधिकाऱ्यांनी संपूर्ण पाणी टंचाई होईपर्यंत वाट बघू नये. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू करा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरी टंचाईग्रस्त लोक राहायला येतील. असा इशारा नरेंद्र पाटील यांनी बैठकीत दिला.१०० गावे टंचाईच्या छायेतयेत्या मे अखेर तालुक्यातील १०० गावे पाणी टंचाईच्या टप्प्यात येणार असून, सध्या बौद्धवस्ती (डावरी) शिद्रु्रकवाडी, आंबेवाडी, घोट (फडतरवाडी), ज्योतिबाचीवाडी अशी ७ गावे टँकरच्या मागणीत आहेत.