शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्व अन् प्रतिष्ठेच्या लढाईत देसाई गट यशस्वी

By admin | Updated: March 24, 2016 23:58 IST

विरोधक पिछाडीवर : आमदारकी ते कारखाना व्हाया सोसायटी, ग्रामपंचायती अन् पंचायत समिती

अरूण पवार -- पाटण --लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि विधानसभेनंतरही आमदार शंभूराज देसाई यांची घोडदौड सुरूच राहिली असल्याचे स्पष्ट झाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी ही देसाई यांची असलेली घोडदौड विरोधक पाटणकर गटाला निश्चित रोखता आलेली नाही. त्यामुळे अद्यापही पाटणकर गट विधानसभेनंतर पिछाडीवर असल्याचे दिसत असले तरी आगामी जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही गटांची झुंज पाहायला मिळणार आहे.देसाई कारखाना म्हणजे देसाई घराण्याची आण, बाण, शान आहे. प्रतिष्ठा-अस्तित्वाचा प्रश्नदेखील कारखान्याच्या निवडणुकीमुळे निर्माण होतो. याच वर्गावर बोट ठेवून आमदार देसाई यांचे प्रतिस्पर्धी विक्रमसिंह पाटणकर यांनी मागीलप्रमाणे निवडणूक लढायला हवी होती. निवडणुकीत पराभव होणार, हे पाटणकरांना माहीत होते. मात्र, याचा पर्याय म्हणजे माघार नव्हे, शेवटी काय झाले. माघार घेऊनसुद्धा पाटणकर यांना आ. देसाई यांनी चांगलेच कोंडीत पकडले. साखर कारखाना निवडणुकीत पाटणकर पिता-पुत्रांनी समोरासमोर येऊन लढायला हवे होते. पडद्याआडच्या हालचाली करून पॅनेल उभे केले हा आणि मोठा पराभव असल्याची प्रतिक्रिया आ. देसाई यांनी निकालानंतर दिली. निवडणूक लढविणार नाही, असे म्हणून चालणार नाही आणि चालले नाही. कारण शेवटी आ. देसाई यांनी पाटणकर गटच निवडणुकीत होता, असा आरोप केला. राजकारणात गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सारे काही क्षम्य असते, हेच खरे.लोकनेते बाळासाहेब देसाई व दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या विचारावर निष्ठा ठेवून सभासदांनी कौल दिला आहे. माझ्या पॅनेलसमोर उभे ठाकलेले विरोधी पॅनेल हे विक्रमसिंह पाटणकर व सत्यजित पाटणकर यांनीच उभे केले होते. या दोघांनी निवडणुकीत पडद्याआड राहून हालचाली केल्या. पाटणकर पिता-पुत्रामध्ये समोर लढण्याची हिंमत नव्हती; पण मतदान व मतमोजणीदिवशी त्यांचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, युवक अध्यक्ष शंकर शेडगे हे सक्रिय उपस्थित होते.-शंभूराज देसाई, आमदार आमदारकीपासून वर्चस्व कायमच..एकेकाळी कारखाना सोडला तर तालुक्याच्या सर्व सत्ता एकहाती पाटणकर गटाकडे होत्या. ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या निवडणुकांत शंभूराज देसाई गटाची डाळ शिजत नव्हती; आता मात्र बाजी पलटली आहे. आमदारकी, पंचायत समिती आणि साखर कारखाना यामध्ये शंभूराज देसाई यांनी वर्चस्व मिळविले आहे.आमदारकीपासून वर्चस्व कायमच..एकेकाळी कारखाना सोडला तर तालुक्याच्या सर्व सत्ता एकहाती पाटणकर गटाकडे होत्या. ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या निवडणुकांत शंभूराज देसाई गटाची डाळ शिजत नव्हती; आता मात्र बाजी पलटली आहे. आमदारकी, पंचायत समिती आणि साखर कारखाना यामध्ये शंभूराज देसाई यांनी वर्चस्व मिळविले आहे.