शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By admin | Updated: October 21, 2014 23:46 IST

विधानसभा निकाल : राजकीय पक्षाचे उमेदवार अधिक

सातारा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत होते. यापैकी ६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून, यामध्ये राजकीय पक्षाचे ३९, तर अपक्ष उमेदवार ३० आहेत. आठपैकी सात मतदारसंघांत शिवसेना, दोन मतदारसंघात भाजप आणि स्वाभिमानी तर बसपा आणि मनसेच्या सर्वच उमेदवारांचा अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणमधील उमेदवार सदाशिवराव पोळ यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. काँग्रेसच्या रजनी पवार, हिंदुराव पाटील यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. फलटण विधानसभा मतदारसंघात दादासाहेब गायकवाड (बसपा), डॉ. नंदकुमार तासगावकर (शिवसेना), पोपटराव काकडे (स्वाभिमानी), शामराव काकडे (भारीप बहुजन महासंघ), चंद्रकांत साळवी (रिपब्लिकन सेना) तर अरविंद अगवणे, आनंदा अगवणे, कृष्णा यादव, दीपक चव्हाण, राहुल अहिवळे, विजय भिसे, विनोद मोरे यांची अनामत रक्कम जप्त झाले. वाई विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव (भाजप), डी. एम. बावळेकर (शिवसेना), मयूर नळ (मनसे), रंजन मोरे (बसपा) तर उमेश वाघमारे, सुनील कडले, विजय वानखेडे, संजय गायकवाड या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.कोरेगाव विधानसभा मतदारसंघात हणमंतराव चवरे, (शिवसेना), वसंतराव मोरे (बसपा), युवराज पवार (मनसे), संजय भगत (स्वाभिमानी), रमेश माने (बहुजन मुक्ती पार्टी), तर अपक्ष उमेदवार शिवाजी शिरतोडे यांची अनामत रक्क जप्त झाली.माण विधानसभा मतदारसंघात किरण सावंत (बसपा), धैर्यशील पाटील (मनसे), रणजित देशमुख (शिवसेना), सदाशिवराव पोळ (राष्ट्रवादी), अजिनाथ केवटे, अनिल देसाई, केशवराव काटे, जगन्नाथ जानकर, शिवाजीराव जाधव, संदीप खरात या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात नरेंद्र पाटील (शिवसेना), उदय कांबळे (बसपा), राजू केंजळे (मनसे), प्रकाश कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी) यांची अनामत रक्कम जप्त झाली. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात डॉ. अजिंक्य पाटील (शिवसेना), सतीश रणशिंगरे (बसपा), अ‍ॅड. विकास पवार (मनसे), अ‍ॅड. अण्णाराव पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी), मुसा मुल्ला (बहुजन मुक्ती पार्टी), अ‍ॅड. मिलिंद देसाई, अ‍ॅड. विद्युलता मर्ढेकर, देवेंद्र शहा, संपत तडाखे या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.पाटण विधानसभा मतदारसंघात शिवाजी कांबळे (बसपा), दीपक महाडिक (भाजप), हिंदुराव पाटील, (राष्ट्रीय काँग्रेस), रवींद्र शेलार (मनसे), प्रियंका साळुंखे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. संदीप माने (शेकाप), हनमंत कांबळे (लोकशासन आंदोलन पार्टी), अंकुश गालवे, चंद्रकांत यादव, दत्तात्रय भिसे, गणेश मोरे, सागर माने, सुनील कांबळे या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.सातारा विधानसभा मतदारसंघातून दिलीप जगताप (बसपा), दगडू सकपाळ (शिवसेना), रजनी पवार (राष्ट्रीय काँग्रेस), राहुल पवार (मनसे), संदीप कांबळे (महाराष्ट्र विकास आघाडी), अभिजीत बिचुकले, सागर भिसे या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. (प्रतिनिधी)शासनाच्या तिजोरीत लाखो रुपये जमासातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात ८७ उमेदवार नशीब आजमावत होते. यापैकी ६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. परिणामी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा झाल. निवडून आलेल्या उमेदवाराच्या एकूण मतांपैकी निश्चित मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला नाही मिळाली तर त्यांची अनामत रक्कम जप्त होते. विशेष म्हणजे शिवसेना, बसपा आणि मनसेच्या सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.