शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ...

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला पाठिंबा देण्याच्या उद्देशानेच पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने खंडाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दीडशेच्या वर शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हे कायदे रद्द करत नाही आणि दुसरीकडे या आंदोलनाला बदनाम करून शहीद आंदोलकांच्या बाबत जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे प्रतिक्रिया देतात त्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, याचाही विचार केंद्र सरकार करत नाही आणि शेतकरी आंदोलकांशी चर्चाही करत नाही, ही बाब गंभीर आहे. हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचे निदर्शनास येत आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून ते तीन कायदे रद्द करून दीर्घकाळ चालू असलेले अन्नदाता शेतकरीवर्गाचे आंदोलन थांबवावे आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष कांतीलाल खुंटे यांनी केली.