शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता रोपांंचीही ‘आॅनलाईन’ मागणी!

By admin | Updated: June 28, 2016 23:36 IST

दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम : जिल्ह्यात ६ लाख ७७ हजार, तर कऱ्हाड तालुक्यातून २१ हजार १३६ रोपांची मागणी

कऱ्हाड : सध्या आॅनलाईन खरेदी व विक्रीचे प्रमाण जास्त वाढले आहे. बदलत्या युगाबरोबर सर्वजण स्मार्ट झाले आहेत. शासनाच्या वतीने ई-गर्व्हनर सुविधा सुरू करण्यात आल्याने याचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ लागला आहे. अशाच प्रकारे शासनाच्या कऱ्हाड तालुका सामाजिक वनीकरण विभागाकडे २१ हजार १३६ रोपांची मागणी आली आहे. तर जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाकडे ६ लाख ७७ हजार इतकी आॅनलाईन मागणीची नोंद झाली आहे. १ जुलै ते ७ जुलै हा कालावधी वनमहोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. विशेषत: या कालावधीत १ जुलै या एकाच दिवशी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ व इतर विभाग, शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था, निसर्ग संस्था, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये आदींमार्फत मोकळ्या जागेत २ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्याही स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने शासनाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सातारा जिल्ह्याला ६ लाख २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ७७ हजार खड्डे वृक्षलावडीसाठी तयार आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात २१ हजार १३६ खड्डे तयार आहेत.सामाजिक वनीकरण विभागामार्फत सध्या शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईनद्वारे जिल्ह्यात वृक्षलागवड करण्यासाठी आलेली रोपांची मागणी याची माहिती नोंदविण्यात आलेली आहे. जिल्ह्यासह प्रत्येक तालुकास्तरावरून दररोज आलेली माहिती ही सामाजिक वनीकरण विभागाच्या ‘महाफॉरेस्ट’ या वेबसाईटवर नोंदविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने मागणी व त्यांची नोंद करण्याची तारीख ही २५ जूनपर्यंत ठेवण्यात आलेली होती. सध्या आॅनलाईन नोंदीचे संकेतस्थळावरील अ‍ॅप हे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलेले आहे. कऱ्हाड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात एक वनक्षेत्रपाल, चार वनपाल, १७ वनरक्षक व वनमजुरांची संख्या चार आहे. या विभागामार्फत येथील लोकसहभागातून ४२ हजार ५०० रोपांची लागवड ही १ जुलै रोजी करण्यात येणार आहे. शासनाने जिल्ह्यास दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, आता जिल्ह्यात खोदण्यात आलेल्या ६ लाख ७७ हजार खड्ड्यांमध्ये १ जुलै रोजी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेस दीड लाख रोपांचे उद्दिष्ट दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेस दीड लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत तालुकास्तरावरील पंचायत समिती, ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीबाबत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. दोन तासांत होणार वृक्षलागवडीची नोंद वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत आॅनलाईन माहिती नोंदविण्यासाठी नेमलेले साईट को-आॅर्डीनेटर हे १ जुलै रोजी प्रत्येक साईटवरती ठेवण्यात आलेल्या नियंत्रण अधिकारी हे दर दोन तासांनी वेबसाईटवर झालेली लागवडीबाबत माहिती मोबाईल अ‍ॅपद्वारे अपलोड करणार आहेत.