शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम करणाऱ्या तरुणाईकडून केळीला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

सातारा तालुक्यात फ्युज बॉक्स उघडे सातारा : सातारा तालुक्यातील अनेक गावांमधील फ्युज बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत. त्याच्या शेजारीच मानवी ...

सातारा तालुक्यात फ्युज बॉक्स उघडे

सातारा : सातारा तालुक्यातील अनेक गावांमधील फ्युज बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत. त्याच्या शेजारीच मानवी वस्ती असून भोवतालीच लहान मुलं खेळत असतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उघड्या फ्युज बॉक्सला दरवाजे बसवावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून केली जात आहे.

शेकोट्याभोवती रंगू लागल्या गावगप्पा

शेंद्रे : सातारा तालुक्यात थंडी कायम असून गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या शेकोटीभोवती गावगप्पा रंगत आहेत. सातारा तालुक्यात कमी-अधिक फरकाने थंडी कायम आहे. सतत गारठा जाणवत आहे.

ऊस वाहतूक वाहनांमुळे धोक्याचे संकेत

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस वाहतूक वाहने धावू लागली आहेत. पण, अनेकवेळा ही वाहने नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्याकडेला उभी करण्यात येतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

बसस्थानकासमोर वाहनांची रांगच रांग

सातारा : बसस्थानकात जाणाऱ्या गाड्या दोन्ही गेटमधून जात आहेत. त्याचवेळी बसस्थानकातून बाहेर येणाऱ्या गाड्याही गेटमध्ये आल्यास वाहतुकीची कोंडी होत असते. बसस्थानकात जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या वाहनांची शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

डांबरीकरणामुळे राजवाडा चकाचक

सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात गोलबागेभोवती डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर चकाचक झाला आहे. या ठिकाणाहून वाहने सुसाट धावत आहेत. मंगळवार तळे, राजधानी टॉवर परिसरात रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागात

थंडीमुळे पिके जोमात

सातारा : काही भागात विद्युत पुरवठा खंडित होत आहे, तर काही ठिकाणी विद्युत ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणी येत आहेत. मात्र, थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ज्वारीसह अनेक पिके चांगली उगवत आहेत.

साताऱ्यातील रस्त्यावर

जीवघेणी कसरत

सातारा : शहरातील रस्त्यावर मोठे फलक लावलेले आहेत. या ठिकाणी जाहिरातीचा फलक लावण्यासाठी मजुरांना जीवघेणी कसरत करावी लागते. अनेक कारागीर जमिनीपासून ५०-६० फूट उंचीच्या फलकांच्या सांगाड्यावर हेल्मेटही वापरत नाहीत.

अजिंक्यतारा किल्ल्यावरील झरा सुकला

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनविभागाच्या कार्यालयाशेजारी असणाऱ्या या झऱ्याचे पाणी सुकले आहे. यंदाच्या पावसाळ्यात भरून वाहणारा हा झरा डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. या ठिकाणी चरण्यासाठी येणारी गुरे व किल्ल्यावरील पशुपक्षी झऱ्यामधील पाणी पिण्यासाठी येत असतात. सध्या या झऱ्याचे पाणी सुकले असून, यावर्षी या झऱ्याला महिनाभर अधिक पाणी होते.

बसस्थानकामध्ये

सीसीटीव्ही कॅमेरे

सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावरून बसस्थानकातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांची नजर असते. यामुळे अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच उकल होते.

जुना मोटार स्टँड भाजी

मंडईत ग्राहकांची गर्दी

सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टँड परिसरात भरत असलेल्या बाजारात दर रविवारी व गुरुवारी मोठी गर्दी असते. मात्र, त्या ठिकाणी परगावाहून येणारे नागरिक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत नाहीत.

साताऱ्यात रात्रीची भाजीविक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : येथील राजवाडा परिसरात रात्रीच्या वेळी भाजीविक्री केली जात आहे. त्यामुळे सातारकरांची चांगलीच सोय होत आहे. असंख्य सातारकर पुणे तसेच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नोकरीस आहेत. ते रात्री साडेआठनंतर साताऱ्यात येतात. मात्र, घरी जाताना भाजी घेऊन जाता येत नाही. राजवाडा परिसरात रात्री उशिरापर्यंत भाजीविक्री केली जात आहे. त्यामुळे नोकरदार मंडळी घरी जाताना भाजी घेऊन जात आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी डबा घेऊन जाण्यास मदत होत आहे. मात्र, ही भाजी विक्री सुरक्षित ठिकाणी उभे राहून करावी, अशी मागणी होत आहे.