शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पुतळा हटविताना पोलिसांवर दगडफेक !

By admin | Updated: January 26, 2016 01:02 IST

म्हसवडमध्ये लाठीहल्ला : चाळीस जणांवर गुन्हा

म्हसवड : येथील शिंगणापूर चौकात सोमवारी पहाटे कार्यकर्त्यांनी बसविलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा विनापरवाना असल्याचे सांगत पालिकेने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला. तेव्हा संतप्त झालेल्या जमावाने एसटी, पालिका आणि पोलिसांच्या दोन गाड्यांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. याप्रकरणी उपनगराध्यक्षासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास म्हसवडच्या शिंगणापूर चौकात रस्त्याच्या कडेला काही कार्यकर्त्यांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ही माहिती तत्काळ मुख्याधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी धावले. पुतळा बसविणाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘विनापरवाना पुतळा बसवू नका,’ असे सांगूनही जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पालिका कर्मचारी व लोकांची बोलणी सुरू असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. पोलीस जीप (एमएच ११ एबी ३१०, एमएच ११ एबी ५०१), पालिकेची जीप (एमएच ११ एबी ९०००) व एसटी बस (एमएच १४ बीटी ४६२८) वर दगडफेक करण्यात आली. पालिकेचे कर निरीक्षक दिलीप रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ (रा. म्हसवड), लुनेश गोरड (रा. दिडवाघवाडी), बाजार समितीचे संचालक युवराज बनगर (रा. पुळकोटी), ‘रासप’चे बबन वीरकर (रा. माळवाडी), राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू काळे (दिडवाघवाडी), पोपट मासाळ (रा. मासाळवाडी) व सुरेश पुकळे यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक सुनील चव्हाण तपास करत आहेत. (प्रतिनिधी)