शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळातील नादुरुस्त वाहने हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर अनेक महिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर अनेक महिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक वाहनांची क्रेनच्या सहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी दरवर्षी साधारण वीस ते पंचवीस लाख पर्यटक भेटी देतात. दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अनेकवेळा वाहतुकीच्या कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी वाहनतळाची असलेली आवश्यकता लक्षात घेत पालिकेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारला आहे. हा वाहनतळही मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना अपुरा पडत आहे. तरीही या वाहनतळाचा काही नागरिकांनी गैरफायदा उठविण्याच्या उद्देशाने आपली भंगार व नादुरुस्त टाकाऊ वाहने या वाहनतळावर आणून उभी केली आहेत. ही वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. या वाहनांमुळे पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत असून पर्यटकांना आपली वाहने अन्यत्र उभी करावी लागत आहेत.

वाहनतळाबरोबरच शहरातील काही रस्त्यांवर अशाचप्रक्रारे वाहने उभी असून मोठा अडथळा होत आहे. याबाबत काही नागरिकांनी मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दाखल घेऊन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी संबंधित वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पालिका कर्मचाऱ्यांना सूचना देऊन एक कृती आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार मुख्याधिकारी पल्लवी पाटील पालिका कर्मचारी व क्रेनसह पालिकेच्या वाहनतळात पोहोचल्या. त्यांनी तत्काळ नादुरुस्त व भंगार वाहनांवर क्रेनच्या सहाय्याने कारवाई सुरू केली. काहींवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे शरद मस्के आदी उपस्थित होते.

चौकट :

अनेकांची पळापळ

मुख्याधिकारी पाटील यांनी सुरू केलेल्या धाडसी कारवाईची माहिती शहरात पसरताच अनेक वाहनधारकांची एकाच धावपळ सुरू झाली. काहींनी आपली वाहने वाहनतळातून बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

फोटो ०२महाबळेश्वर कारवाई

महाबळेश्वर पालिकेच्या वाहनतळात अनेक महिने उभी असलेली वाहने शुक्रवारी हटविण्यात आली. (छाया : अजित जाधव)