शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐंशी टन वजनाच्या महाकाय गव्याचा मृत्यू

By admin | Updated: February 5, 2016 23:43 IST

बोंद्री जंगल : झुंजीवेळी झाडात मान अडकल्यानेगमवावा लागला प्राण

मणदुरे : दोन जंगली गव्यांच्या झुंजीत एका दोन टनी वजनाच्या गव्याचा झाडात अडकून मृत्यू झाला. ही घटना बोंद्री गावच्या वनविभागाच्या राखीव जंगलात घडली. वनविभागाच्या फिरत्या पथकास हा गवा गुरुवारी मृतावस्थेत आढळला. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटणच्या पश्चिमेस बोंद्री हे गाव असून लगतच डोंगर आहे. याच ठिकाणी वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे. हा विभाग तीव्र उताराचा व दाट झाडीचा असल्याने परिसरात जंगली गव्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. जाईचीवाडी येथील धोंडिराम पवार यांना गव्याने जखमी केले होते.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘दोन जंगली गव्यांची झुंज लागली होती. एक नर जातीचा गवा झुंजीत तीव्र उताराने घरंगळत खाली आला. दोन झाडांच्या मध्यभागी या गव्याची मान अडकली व मागचे दोन पाय तोंडाजवळ येऊन झाडामध्ये अडकले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी वनविभागाचे अधिकारी जयवंत कवर व वनपाल संजय जाधव हे नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.वनविभागाचे अधिकारी सहायक वनसंरक्षक एस. व्ही. मुळे, जयवंत कवर, एस. व्ही. लोखंडे, प्रमोद पाटील, संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय विस्ताराधिकारी डॉ. एम. जे. मोरे यांनी शवविच्छेदन केले. या गव्यास त्याचठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. (वार्ताहर)अंत्यसंस्कारासाठी दोन ट्रॉली लाकूडया दोन टन वजनाच्या महाकाय गव्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल दोन ट्रॉली लाकूड लागले. तीव्र उताराच्या जंगलातच त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी बोंद्री ग्रामस्थांनीच घरातून लाकडे आणली.