शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 12, 2016 00:51 IST

दोघेही शेतकरी: आखाडेत शोककळा; केबल काढताना दुर्घटना

मेढा/कुडाळ : शेतात नांगरताना आडवी येणारी टीव्ही केबलची वायर बाजूला करत असताना विजेचा धक्का बसल्याने दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना जावळी तालुक्यातील आखाडे येथे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. भास्कर शिवराम गुंजाळे, शरद दिनकर शिंदे अशी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आखाडे येथील शरद शिंदे (वय ५५) आणि भास्कर गुंजाळे (६२) हे शनिवारी सकाळी सात वाजता मणीची पट्टी शिवारात मशागतीसाठी औत घेऊन गेले होते. नांगरत असताना त्यांना शेतात केबल पडलेली आढळली. ही केबल आडवी येत असल्याने शरद शिंदे हाताने ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. शिंदे यांना केबलपासून बाजूला करत असतानाच भास्कर गुंजाळे यांनाही विजेचा धक्का बसला. या धक्क्याने भास्कर गुंजाळे आणि शरद शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या शेतानजीक असलेल्या किसन आंबुले यांच्या विहिरीवर मोटार बसविण्यात आली असून, त्याची विद्युत जोडणी या शेतातून नेली आहे. या शेतातूनच टीव्ही केबलही गेली आहे. दोन्ही वायरी एकमेकांना जोडलेल्या आढळल्या. शेतीपंपाची वायर आणि केबलला एकमेकांना आधार म्हणून त्या गुंफल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी केबलही तोडलेली आढळली. टीव्ही केबलला विजेचा धक्का बसणार नाही, असे गृहीत धरून शिंदे यांनी ही वायर हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे धक्का बसून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ताबडतोब विद्युत पुरवठा खंडित करून दोघांना केबलपासून बाजूला केले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रणजित देसाई, महावितरणचे सहायक अभियंता थोरवडे, कुडाळ उपविभागाचे कनिष्ठ अभियंता यादव यांनी तातडीने भेट दिली. शरद गुंजाळे यांचे भाऊ विलास हे वीज कर्मचारी आहेत. ही दोस्ती तुटायची न्हाय... शरद शिंदे आणि भास्कर गुंजाळे हे दोघेही चांगले मित्र होते. त्यांचा जमिनीत वारंगुळा होता. एकमेकांच्या शेतातील सर्व कामे ते दोघे एकत्र करीत होते... अन् शनिवारच्या दुर्घटनेत दोघांचाही एकदमच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)