शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बगाड यात्रेच्या तोंडावर धोक्याची घंटा

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

बावधन बसस्थानक दुर्लक्षाच्या फेऱ्यात : शालेय विद्यार्थी, प्रवाशांना धोका; दुर्घटना घडायची पाहिली जातेय वाट--एस्टीला हवाय धक्का - दोन

तानाजी कचरे -- बावधन --दुर्गंधीने वाढलेला बावधन बसस्थानक परिसर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. विशेषत: या परिसरातच बावधन हायस्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण धोकादायक बनले आहे.शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले लघुशंकेकरिता तिथे जात असल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. अवकाळी येणाऱ्या पावसात आडोसा म्हणूनही प्रवासी या ठिकाणी जात असल्याने अशावेळीही या ठिकाणी एखादा अपघात होऊ शकतो. गावातील विद्यार्थी अथवा प्रवाशांचा जीव गेल्यावरच परिवहन प्रशासन जागे होणार का? बसस्थानकाची पडलेली इमारत धोकादायक बनली आहे. ही पाडून या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बावधन गाव व परिसरातील मुले या ठिकाणच्या शाळेत शिकण्याशाठी येतात. पालक आणि शिक्षक मंडळी यांनीही या बाबत ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा तक्रार केली आहे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर जाण्यास मज्जाव केला असला तरी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस मुले तेथे रेंगाळतात. तेथील घाण आणि दुर्गंधी याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. येथे शेजारीच ओढा असल्याने साप आणि विंचवाचीही भीती आहे. त्यासाठी मोडकळीस आलेले बसस्थानक आसपासचा परिसर स्वच्छ करण्यासाठी पालकांचा दबाव वाढत आहे.उन्हातान्हात ताटकळत उभे राहणाऱ्या प्रवाशांचे बसस्थानकांच्या दुरवस्थेबाबत नाराजी आहे. विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या सुरक्षेची हमी परिवहन विभाग घेणार का? हाच प्रश्न आहे. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे.याबाबत अनेकदा पत्रव्यवहार होऊनही परिवहन खाते अजून गप्प का? असा सवालही उपस्थित होत आहे. ( क्रमश:)माजी विद्यार्थी सरसावले..गावातील माजी विद्यार्थी संघटना यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे दर्शविले आहे. तसा पत्रव्यवहार त्यांनी ग्रामपंचायतीकडे केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याआधी हा परिसर अपघात मुक्त व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.