शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष वाढले आहेत. या वृक्षांच्या फांद्यामुळे मोठ्या वाहनांचे ...

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष वाढले आहेत. या वृक्षांच्या फांद्यामुळे मोठ्या वाहनांचे नुकसान होत आहे. महामार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. माल वाहतूक वाहनांचीही ये-जा असते. मोठ्या वाहनांच्या काचांना वृक्षांच्या फांद्या थटून काचा फुटत आहेत. या धोकादायक फांद्या तसेच वृक्ष हटविण्याची मागणी होत आहे.

गटरमुळे दुर्गंधी

कऱ्हाड : शहरातील मंडई परिसरात असलेली गटारे सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. भाजीपाला विक्रेते शिल्लक राहिलेला भाजीपाला तसेच कचरा गटारांमध्ये टाकत असल्याने तो कुजून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पालिकेने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नागरिकांची गैरसोय

कऱ्हाड : सैदापूर, कृष्णा कॅनॉल चौक परिसरात नागरिकांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत आहे. कृष्णा कॅनॉल परिसरात व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून याठिकाणी ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी नागरिक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.

पथदिव्यांची गरज

मलकापूर : मलकापूर भाजी मंडई ते कृष्णा रुग्णालय परिसरात उपमार्गावर महिलांची नेहमीच वर्दळ असते़ या परिसरात पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने अनेकवेळा अनुचित प्रकार घडतात़ हा परिसर रात्रीच्यावेळी निर्मनुष्य असतो. तसेच येथे उड्डाणपूल असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. अनुचित घटना रोखण्यासाठी येथे पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़