शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पुलावरील कठडा बनला धोकादायक

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

अपघाताची भीती : वर्ष होऊन गेले तरी दुरुस्ती नाही

सचिन लाड - सांगली -माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावरील लोखंडी कठडा तुटल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून हा कठडा तुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो दुरुस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सायंकाळनंतर वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहने तुटलेल्या कठड्यावरून रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गतवर्षी पुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात टाटा सुमोने रिक्षाला जोराची धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक व तीन प्रवासी असे चौघे ठार झाले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर सुमो पुलाच्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली होती. यामध्ये कठडा निखळून पडला होता. या घटनेला वर्ष होऊन गेले तरी, कठडा दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. कठडा असुरक्षित असल्याने त्यामुळे आता अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओव्हरटेक करू नये, असे फलक लावूनही पुलावर जीवघेणे ओव्हरटेक सुरूच आहेत. सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेकच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होत आहेत. रात्रीच्यावेळी वाहनधारकांच्या तोंडावर समोरच्या वाहनांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश पडल्यानंतर पुढचे काहीच दिसत नाही. यातून लक्ष विचलित होऊन वाहन तुटलेल्या कठड्यावर आदळून रेल्वे रुळावर पडू शकते. शहरामध्ये सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावर होत असते. या मार्गावरील गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने जातात. या रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय या मार्गावर असल्यामुळे वाहनांची वर्दळ मार्गावर अधिक असते. रात्रीच्यावेळी वाहनधारक अपघात करुन निघून जातात. असे प्रकार अनेकदा झाले आहेत. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशीही मागणी नागरिकांतून होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना काळजी पुलावर झालेल्या एका अपघातात चौघांचा बळी गेल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पुलाच्या मध्यभागी वाहतूक पोलिसांच्या मदतीने पांढरे पट्टे मारले होते. पुलाच्या दोन्ही बाजूस ‘ओव्हरटेक करू नये’, असे फलक लावले होते. या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय असल्यामुळे या मार्गावर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते.