शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज आरक्षणाबाबत दुटप्पीपणा!

By admin | Updated: March 29, 2015 00:43 IST

अजित पवारांचा निषेध : सामाजिक, आर्थिक कुचंबणेसाठीच सर्व प्रयत्न

सातारा : ‘धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणे घटनाबाह्य ठरेल, अशी शिफारस आघाडी शासनाच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली होती,’ असा गौप्यस्फोट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर सातारा जिल्ह्यात याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. धनगर समाजातील मान्यवरांनी अजित पवार यांचा निषेध केला आहे. पवार घराण्याची दुटप्पी चाल आता समोर आली आहे, अशा शब्दातही त्यांनी हल्लाबोल केला आहे. धनगर समाज आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या सुधारू नये, यासाठीच हे प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यास सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांनी करताच आघाडी शासनाच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने धनगर समाजाला सवलती देणे घटनाबाह्य ठरेल, अशी शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. त्यानंतर राज्यातील धनगर समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेधही करण्यात आला. याबाबत सातारा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्याबरोबरच शरद पवार यांच्यावरही टीकेची झोड उठविली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नयेत म्हणूनच सर्व राजकारण सुरू आहे. धनगर समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या कुचंबणा व्हावी म्हणून हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पण, घटनेने दिलेले आरक्षण राजकर्त्यांमुळेच अडकले आहे. अजित पवार यांनी केलेली शिफारस चुकीची आहे. एकप्रकारे त्यांनी धनगर समाजाचा नाहीतर घटनेचाच अपमान केलेला आहे. एकीकडे धनगर समाजाला आरक्षण देण्याविषयी बोलायचे आणि दुसरीकडे मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे. ही पवार घराण्याची नेहमीचीच दुटप्पी चाल आहे. याला राज्यातील धनगर समाज बळी पडणार नाही. घटनेने दिलेले आरक्षण हे आम्ही मिळविणारच आहे, असा स्पष्ट इशाराही धनगर समाजातील जानकर, खटके आणि गावडे यांच्यासह इतर नेत्यांनी दिला. (प्रतिनिधी)