शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला; पण कोरड पडणार घशाला!

By admin | Updated: November 2, 2014 23:32 IST

वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा रिकामा : पाणीसाठ्याने गाठला तळ, भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा पूर्णपणे उघडा आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळीने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, काही दिवसांतच विभागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. धरणाचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्यात यावा, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत़युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले़ ‘आधी पुनर्वसन मग धरण’ असे धोरण युती शासनाने राबविले. त्यामुळे रेठरेकरवाडी, यादववाडी या गावांचे पुनर्वसन त्यावेळी योग्य पद्धतीने झाले़ पुढे १९९९ मध्ये युती शासनाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या़ त्यानंतर धरणाच्या कामांना कधी गती प्राप्त झालीच नाही़ गत दोन वर्षांपूर्वी घळभरणीचे काम पूर्ण करून धरण व्यवस्थापनाने वांग-मराठवाडी जलाशयात ०़६० टीएमसी एवढा पाणीसाठा करण्यास सुरुवात केली होती़ मात्र, त्यानंतर वांग-मराठवाडी कृती समितीने सलग सात दिवस मोठे आंदोलन करून शासनाला धरणाचे पाणी सोडून देण्यास भाग पाडले़धरणग्रस्तांनी केलेले आंदोलन योग्यच होते, कारण त्यांच्या त्यागातूनच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संसार फुलणार होते. मात्र, ज्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीला चार एकराचे स्लॅब लावून जमिनी काढून घेतल्या, त्या शेतकऱ्यांना गेली पंधरा वर्षांपासून पाणी मिळत नसेल तर त्या धरणाचा उपयोग काय ? असा सूर लाभक्षेत्रतील शेतकऱ्यांच्या मधून उमटू लागला. गतवर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी आमच्या शेतीला पाणी द्या; अन्यथा आमच्या काढून घेतलेल्या जमिनी परत करा, अशी भूमिका घेतली होती़ त्यामुळे शासनाने उन्हाळा चालू होण्याच्या अगोदर पाणी साठवण्यास सुरुवात केली होती़ परिणामी, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता़सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र, तरीही धरणाचे गेट पूर्ण खुले आहे़ त्यामुळे जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे़ पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत अडकला आहे़ धरणाचे गेट बंद करा आणि जलाशयामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात करा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)पंधरा वर्षांपासून काम सुरूचवांग-मराठवाडी धरणाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. या धरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने काम आटोपण्यात आले. मात्र, हळूहळू कामाचा वेग मंदावला. कधी निधीचा तुटवडा तर कधी तांत्रिक कारणास्तव काम बंद ठेवण्यात आले. अशातच धरणग्रस्तांनीही आपल्या न्याय हक्कांसाठी वारंवार आंदोलने केली. धरणाचे काम बंद पाडले. त्यामुळे पंधरा वर्षांपासून काम सुरू असूनही अद्याप धरण पूर्ण झालेले नाही.