शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन खर्च ‘ट्रू व्होटर अ‍ॅपवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:09 IST

सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च दैनंदिन पध्दतीने ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’वर भरणे आवश्यक आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी ...

सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च दैनंदिन पध्दतीने ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’वर भरणे आवश्यक आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसूल कीर्ती नलावडे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक विषय सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ट्रू व्होटर अ‍ॅपचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यामधील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये केलेल्या दैनंदिन व एकूण खर्चाचा तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर अ‍ॅपमध्ये भरणे अनिवार्य केले आहे.

यासाठी उमेदवारांनी गुगल प्लेस्टोअरवरुन ट्रू व्होटर अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी तालुक्यातील संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची गुरुवारी बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या.

चौकट..

तीस दिवसांत खर्चाचा तपशील बंधनकारक

निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी (बिनविरोध, विजयी, पराभूत) निवडणुकीचा निकाल प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत एकत्रित खर्चाचा तपशील विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह सादर करणे हे देखील अनिवार्य आहे.