शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अंधार पडताच ‘आपोआप’ दिवेलागण!

By admin | Updated: May 22, 2014 00:43 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञान : पोवई नाका-विसावा नाका रस्त्यावर लखलखाट

 सातारा : पोवई नाका ते विसावा नाका या तीन कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, चकाचक झालेल्या या रस्त्यावर बसविण्यात आलेले अत्याधुनिक, स्वयंचलित पथदिवे सुरू झाल्याने हा रस्ता झगमगाटाने उजळून निघाला आहे. वाहनांच्या गर्दीने नेहमी गजबजणारा हा रस्ता आता रोषणाईने लखलखला आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांसाठी रस्ता सुरक्षित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. अंधार होताच आपोआप सुरू होणारे आणि उजेड पडताच बंद होणारे पथदिवे सातार्‍यात प्रथमच बसविण्यात आले आहेत. पोवई नाका ते विसावा नाका रस्ता दुपदरी होता. याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक अशी शासकीय व सहकारी कार्यालये असल्याने; तसेच जिल्हा सत्र न्यायालय याच रस्त्यावर असल्याने जिल्हाभरातून येणार्‍या वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. रस्ता दुपदरी असल्याने येथे वारंवार वाहतुकीचा खोळंबा; तसेच लहान-मोठे अपघातही होत होते. या रस्त्याचे चौपदरी करण होऊन रस्ता रुंद करण्याची मागणी होती. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा करून अर्थसंकल्पीय कामांतर्गत या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. सातारा शहराचे प्रवेशद्वार असणार्‍या या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण झाले आहे. बारामतीमधील रस्त्यांवर असणार्‍या अत्याधुनिक पथदिव्यांसारखे दिवे या मार्गावर बसविण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकारी अभियंता शरद राजभोज व सहायक कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे यांना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागामार्फत या रस्त्यावर ऊन, वादळी वारा व पावसाचा सामना करणार्‍या तसेच गंजविरोधी आणि वीजबचत करणार्‍या पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. ४४ खांब व ८८ फिटिंगमध्ये बसविण्यात आलेल्या या दिव्यांसाठी ३ ठिकाणी ‘सेन्सिटिव्ह टायमर्स’ बसविण्यात आले आहेत. अंधार पडताच सुरू होणारे आणि उजेड होताच बंद होणार्‍या या दिव्यांसाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्याने विजेची बचत होणार आहे. भव्य रस्त्यावर दुभाजक, पदपथ आणि पथदिवे या सुविधांची भर पडल्याने समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)