शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

कऱ्हाडच्या प्रांतांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 12, 2016 00:36 IST

मारहाणप्रकरण : ट्रक चालकाची तळबीड पोलिसांत फिर्याद

कऱ्हाड : वडोली-भिकेश्वर, ता. कऱ्हाड येथील वाळू ठेक्यावरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना कऱ्हाडचे प्रांताधिकारी किशोर पवार हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, चालकाने याबाबत तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सचिन काशीनाथ पवार (वय ३६, रा. रत्नदीप बंगला, गजानन हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सचिन यांना त्यांचा मित्र शरद जाधव याचा फोन आला. वडोली-भिकेश्वर येथे वाळूच्या अवटीवर ट्रक बंद पडल्याचे सांगून मिस्त्रीला त्याठिकाणी घेऊन ये, असे त्याने सचिन यांना सांगितले. मात्र, त्यावेळी सचिन हे त्यांच्या ट्रकच्या पासिंगचे पैसे भरण्यासाठी विजयनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. तेथील काम संपल्यानंतर वारुंजी फाटा येथून मिस्त्रीला घेऊन सचिन पवार हे तासवडे टोलनाकामार्गे कारने वडोली-भिकेश्वरमध्ये गेले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी वाळूचे काही ट्रक अडविल्याचे त्यांना दिसले. नादुरुस्त ट्रकजवळ गेल्यानंतर मिस्त्रीने संबंधित ट्रक दुरुस्त केला. काम सुरू असतानाच दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक प्रांताधिकाऱ्यांची जीप त्याठिकाणी आली. जीपमधून प्रांताधिकारी किशोर पवार खाली उतरले. ‘येथे का थांबला आहेस,’ अशी विचारणा त्यांनी सचिन पवार यांना केली. ट्रक दुरुस्त करीत असल्याचे सचिन यांनी सांगितले. मात्र, प्रांताधिकाऱ्यांनी काहीही न ऐकता त्यांच्या जवळील लाकडी दांडक्याने सचिन पवार यांना मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सचिन पवार यांच्याबरोबरच ट्रक दुरुस्तीसाठी आलेला मिस्त्री व अन्य एकालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रांताधिकारी किशोर पवार यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल या मारहाणीत जखमी झालेल्या सचिन पवार यांच्यावर उंब्रज येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)