शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा किलो सोने लंपास करणाऱ्या सराफावर गुन्हा

By admin | Updated: November 2, 2014 00:40 IST

कऱ्हाडात खळबळ : लुटीचा बनाव अकरा महिन्यांनंतर उघड

कऱ्हाड : तब्बल सव्वा किलो सोने गायब केल्याप्रकरणी कऱ्हाडातील सराफावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अकरा महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, घटनेमुळे कऱ्हाडच्या सराफ व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे़ मदन रामदास घाडगे (रा़ सिध्दी कॉर्नर, सैदापूर) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डुबल गल्लीत राहणाऱ्या भरत केराप्पा लेंडवे हे सोन्या-चांदीच्या आटणीचा व्यवसाय करतात. गत दहा वर्षांपासून त्यांच्या मामाचा मुलगा शंकर धोंडिराम शिणगारे यांच्या रामेश्वरी रिफायनरी या आटणीच्या दुकानात ते कामास आहेत. या व्यवसायातूनच त्यांची मदन घाडगे याच्याशी ओळख झाली. मदन घाडगे हा आटणी व्यावसायिकांकडून आटणी केलेले सोने, चांदी व इतर दागिने घेऊन त्याची विक्री करतो. १३ डिसेंबर २०१३ रोजी मलकापूर येथील मनीष ज्ञानदेव बामणे हे त्यांच्याकडील गंठण, वेडणी, नेकलेस घेऊन रामेश्वरी रिफायनरीमध्ये आले. दागिने आटणी करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार दागिन्यांची आटणी केल्यानंतर १ हजार १८ ग्रॅम वजनाचे चोख सोने निघाले. बामणे यांनी आटणी केलेले सोने विक्री करायचे असल्याचे भरत लेंडवे यांना सांगितले. त्यानुसार लेंडवे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे एजंट मदन घाडगेला बोलविले. बामणे यांचे १ हजार १८ ग्रॅम व दुकानातील ११० ग्रॅम असे १ हजार १२८ ग्रॅम वजनाचे सोने विक्री करण्यासाठी मदन घाडगेकडे देण्यात आले. त्याचवेळी घाडगेने विट्यातील एका व्यापाऱ्यास सर्वांसमोर फोन करून सौदा फायनल केला. १४ डिसेंबर २०१३ रोजी घाडगे संबंधित सोने घेऊन निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दुवशी भरत लेंडवे यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन घेतला नाही. त्यानंतर वारंवार घाडगेशी संपर्क साधण्याचा लेंडवे यांनी प्रयत्न केला. अखेर सायंकाळी घाडगेने फोन घेऊन आपल्याला चोरट्यांनी लुटल्याचे लेंडवे यांना सांगितले. तसेच आपण सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे भरत लेंडवे तत्काळ सह्याद्री रुग्णालयात गेले. त्यांनी घाडगेच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, सोन्याबाबत विचारण्याची ही वेळ नसल्याने ते तसेच परत घरी निघून आले. काही दिवसांनंतर डिस्चार्ज घेऊन भरत घाडगे घरी आल्यानंतर लेंडवे यांनी वेळोवेळी सोन्याबाबत विचारणा केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर भरत लेंडवे यांनी पोलीस उपअधीक्षकांना अर्ज दिला. (प्रतिनिधी)