शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पोत्यात आढळले कोयते अन् तलवारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवादविरोधी पथकाने रात्र गस्तीदरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेत ...

सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवादविरोधी पथकाने रात्र गस्तीदरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेत ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या तरुणाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यात आढळून येणार्‍या बेकायदेशीर शस्त्रांबाबत कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. त्यानुसार जिल्हा विशेष शाखा व दहशतवादविरोधी पथक गुरुवारी रात्री शहरात पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते, प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, सुमित मोरे, केतन जाधव, राहुल वायदंडे हे सातारा शहर व परिसरात रात्रगस्त करत होते. त्यावेळी रात्री नऊच्या सुमारास दिव्यानगरी ते कोंडवे रस्त्यावर गोवर्धन कॉलनी येथे एक अनोळखी तरुण या पथकाला पाहून तेथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीच्या मागे जाऊन लपून बसला. हे पाहताच पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. तसेच त्याची वागणूक व हालचालीवरून संशय वाढला. यावेळी झडती घेतली असता, त्याच्याजवळ एका पोत्यात ११ धारदार शस्त्रे मिळाली. यामध्ये ७ लांब कोयते आणि ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. या शस्त्रांची किंमत १८,५०० रुपये आहे. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी अटक केलेल्याचे नाव सचिन बाळू चव्हाण (वय २८, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) असे आहे.

दहशतवादविरोधी पथकाने तरुणाला पकडल्यानंतर त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. तालुका पोलीस ठाण्यात या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

.........................................................................