शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोखळीत एकीच्या जोरावर कोरोनामुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

फलटण : गोखळीसह आणि पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गोखळी ग्रामस्थांनी एकत्र येत उपाययोजना केल्या. यामुळे गोखळी ...

फलटण : गोखळीसह आणि पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गोखळी ग्रामस्थांनी एकत्र येत उपाययोजना केल्या. यामुळे गोखळी गाव कोरोनामुक्त झाले आहे.

फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत आणि तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून कोरोना विलीनीकरण कक्ष १३ मेपासून सुरू केला होता.

गावातील विलीनीकरण कक्षामध्ये एका महिन्यात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना प्रत्येकी एक झाड देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

विलिनीकरण कक्षातील रुग्णसंख्या ७ जूनपासून गोखळी येथे कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर रोखण्यात यश मिळवले.

याकरिता योगदान देत असलेल्या कोरोना योद्ध्याचा, दररोज मोफत सेवा देणाऱ्या गावातील डॉ. शिवाजीराव गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. विकास खटके, डॉ. सानिया शेख, आशा वर्कर्स दुर्गा आडके, अंगणवाडीसेविका सुरेखा आटोळे यांचा कोरोना आपत्ती समितीच्या वतीने अध्यक्ष सरपंच सुमनताई गावडे यांचे हस्ते झाडं देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उद्धवराव गावडे उपस्थित होते.

या वेळी डॉ. गावडे म्हणाले, ‘आपल्या गावातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी यापुढेही दुसऱ्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर अद्याप लसीकरणासाठी लस उपलब्ध झाली नाही. सर्व लाभार्थी यादी तयार करून त्यांना लस उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी सरकारी लसीकरणासाठी वेळ न घालवता पैसे खर्च करून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. परंतु ज्यांची लस विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यासाठी गावपातळीवर नियोजन करण्याची गरज आहे.’

राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र भागवत यांनी आभार मानले.