शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात कोरोनामुक्तिचा दर ९६.६ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

मलकापूर : गत पंधरा दिवसात मलकापुरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ ...

मलकापूर : गत पंधरा दिवसात मलकापुरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून, त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, ‘होम आयसोलेशन’मध्ये कोणीही नाही. त्यामुळे मलकापुरात कोरोना मुक्तिचा दर वाढून ९६.६ टक्क्यांवर गेला आहे. शहराचा मृत्यूदर ३.१ टक्क्यावर स्थिर आहे, तर ०.३ टक्केच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभाविपणे राबवल्यामुळे मलकापुरात गत दोन महिन्यात बाधितांचा आकडा झपाट्याने कमी होत आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण झाले होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन करून उपचार केल्याने एक महिन्यातच शहरातील सर्व ३१ रुग्ण बरे झाले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जूनला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला आणि चार महिने टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यातच कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला दिवसाला १०-१२ जण, तर शेवटी केवळ ३ ते ४ रुग्ण सापडले.

नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २ ते ३ जण बाधित येत होते, तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडल्याने दिवसाला एकही सापडला नाही. या महिन्यात काहीवेळेला आठ-आठ दिवस एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. याबरोबरच या महिन्यात एकही मृत्यू झाला नाही. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबले नसल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

- चौकट

... असे वाढले रुग्ण

१) २२ एप्रिल ते २४ मे : ३१

२) २५ मे ते २५ जून : ०

३) २६ जून ते २६ जुलै : ४३

४) २७ जुलै ते २६ ऑगस्ट : ३३८

५) २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर : ४२८

६) २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर : १५९

७) २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर : ६९

८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर : १८

- चौकट

मलकापूर लेखाजोखा

एकूण : १०८६

मृत्यू : ३५

डिस्चार्ज : १०५१

उपचारार्थ : ४

आयसोलेट : ०

फोटो : ०३केआरडी०५

कॅप्शन : मलकापूर येथे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अद्यापही संशयित रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेतले जात आहेत.