वाई : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पसरणी गाव कोरोनाच्या रडारवर होते. पहिल्या लाटेत तालुक्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या पसरणी गावातील तरुणांनी पुढाकार घेतल्याने कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यात यश आले,’ असे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरून वाई तालुक्यातील पसरणी या गावी विलगीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘गावातील बाधितांची संख्या कमी होण्यासाठी वैद्यकीय अनेक उपक्रम या गावात राबविण्यात आले; परंतु वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पसरणी गावात विलगीकरण कक्षाची आवश्यकता होती. हा कक्ष सुरु करण्यात तरुणांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे.
यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुनीता संजय कांबळे, सरपंच हेमलता गायकवाड, बाजीराव महांगडे, संपत बापू महांगडे, प्रमोद महांगडे, स्वप्नील गायकवाड, संजय आप्पा कांबळे, अमोल महांगडे, राजेंद्र येवले, रवींद्र महांगडे, वैभव पवार, मधुकर भिसे, उत्तम गाढवे, मनोज मांढरे, संदीप प्रभाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : १४ पसरणी
वाई तालुक्यातील पसरणी येथे सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.