शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ब्रेथ अ‍ॅनालायझर धूळ खात अन् मद्यपी सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:40 IST

सातारा : मद्य प्राशन केलेले वाहनचालक ओळखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राचा वापर केला जात होता. ...

सातारा : मद्य प्राशन केलेले वाहनचालक ओळखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राचा वापर केला जात होता. मात्र, वर्षभरापासून कोरोनामुळे हा वापर पूर्णपणे थांबला. त्यामुळे मद्यपींचे फावले असून, अशा मद्यपी वाहनधारकांना ओळखायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. वर्षभरापासून पोलिसांकडे २१ ब्रेथ अ‍ॅनालायझर धूळ खात पडून आहेत.

कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर करण्यावर निर्बंध आले. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील ९ ठिकाणी नाकाबंदी केली होती. मात्र, या नाकाबंदीत पोलिसांना एकही मद्यपी वाहन चालक आढळून आला नव्हता. त्याचे कारण म्हणजे ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर झाला नाही. परंतु रस्त्याने दुचाकीवरून जाताना पोलिसांनी काहीजणांना अडवले. त्यांच्या तोंडाला दारूचा वास आल्यानंतर पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कारवाई केली. मात्र, कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येत होत्या.

चौकट :

जुलैनंतर एकाही मद्यपीवर कारवाई नाही

मार्चपासून डिसेंबरपर्यंत शहरात केवळ ११ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मार्चमध्ये ३, तर त्यानंतर मे महिन्यात ५ आणि जुलै महिन्यात ३ अशा ११ जणांवर कारवाई करण्यात आली. ऑगस्टनंतर मात्र, एकाही मद्यपीवर कारवाई झाली नाही. या काळात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यामुळे या कारवाया थंडावल्या.

कोट :

कोराना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे शासनाने ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर करण्यास निर्बंध घातले आहेत. मात्र, तरी सुद्धा मद्यपींवर अलीकडे कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.

- विठ्ठल शेलार,

सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा

चौकट :

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह कारवाई

जानेवारी ३८

४९

फेब्रुवारी १३

३२

मार्च ३

००

मे ५

००

जून ००

००

जुलै ३

५५

ऑगस्ट ००

सप्टेंबर ००

ऑक्टोबर ००

नोव्हेंबर ००

डिसेंबर ००

...................................

चौकट :

कोरोना काळात सर्वाधिक खरेदी

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, तरी सुद्धा अनेकजण लपून छपून मद्य विक्री करत होते. अशा व्यावसायिकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाया केल्या. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा वाईन शॉप दुकानांवर अक्षरश: रांगा लागल्या. अनेकांनी घरात स्टॉक करून ठेवला. त्यामुळे कोरोना काळात मद्य विक्रीचा खप सर्वाधिक जास्त होता.

..............................