शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

भाग्यलक्ष्मीच्या कुशीत पिकांना तांब्याने पाणी

By admin | Updated: July 15, 2015 21:17 IST

\कोयना परिसरात पिकांची होरपळ : शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची खांद्यावर घागर; तरवे वाळण्याची भीती

राजेंद्र सावंत - मणदुरे -पावसाचे माहेरघर असणाऱ्या पाटण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सिंचनक्षेत्र नसलेल्या कोरडवाहू क्षेत्रावर संकट ओढावले आहे. कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी डोक्यावर हंडा घेऊन तांब्यांने पाणी घालून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड दिसत आहे.उन्हाळ्यात पडलेल्या वळवाने शेतकऱ्यांनी पाटण तालुक्यात मशागतीची कामे चांगल्या पद्धतीने उरकून घेतली होती. २ जूनपासून तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली. पेरण्यांची कामे चांगल्या पद्धतीने होऊन पिकांची उगवणही जोमात झाली आहे. शेतकऱ्यांनी कोळपणीची कामेही उरकून घेतली आहेत. भांगलणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी पिकांना खतांची मात्रा दिल्याने व सध्या पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पाटण तालुक्याच्या मोरणा, मणदुरे, कोयना विभागात लागणीच्या भातांची लागण मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्यासाठी तृप्ती, आर चोवीस, तेलदौसा, आजरा आदी जातींच्या भाताची लागवड केली जात असते. शेतकऱ्यांनी त्यासाठी मशागती करून भाताचे तरवे केले आहेत. काही शेतकऱ्यांनी वाढीसाठी या तरव्यांवर खते विस्कटली आहेत. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिली असून, उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कोवळ्या पिकांना उन्हाच्या झळा सोसत नाहीत. पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. या पावसाळ्यात सुरुवातीलाच कोयना परिसरात पंधरा दिवसांमध्ये विक्रमी १ हजार २०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु ज्याठिकाणी डोंगर परिसरात सिंचनाची सोय नाही, त्याठिकाणी हे तरवे जगविण्यासाठी डोक्यावरून पाणी आणून पिकांना द्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. आणखी आठ दिवस अशीच पावसाने ओढ दिल्यास शेतकऱ्यांची हातची पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. डोंगर कपारीतील गावात नाचणी हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते; मात्र तरवे वाळत असल्यामुळे ते जगविण्यासाठी पाणी डोक्यावरून आणूनच तांब्याने ते तरव्यांवर शिंपडावे लागत आहे. शेतकऱ्यांना मदत हवी...पावसाने ओढ दिल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी १ टक्का युरिया १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास पिके तग धरू शकतात. शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी ही उपाययोजना करणे गरजेचे आहे.- एस. एस. चव्हाणकृषी सहायक, पाटणकोणतेही पीक घ्यायचे असल्यास सामान्य शेतकऱ्याला अगोदर कर्जाचे ओझे घ्यावे लागते. आता पावसाने ओढ दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. तांब्याने पाणी देऊन किती दिवस ही पिके तग धरणार? शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. - संजय शिंदेशेतकरी, चिटेघरकोयना धरणातील पाणीसाठा५०.९८ टीएमसीकोयना विभागातील एकूण पाऊस१,२४३ सेमीनवजा विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमीमहाबळेश्वर विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमी