शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात रचना २०१५ बांधकाम विषयक प्रदर्शन

By admin | Updated: February 2, 2015 00:09 IST

बिल्डर्स असोसिएशन : मंडप उभारणी; दि. १४ पासून प्रारंभ

सातारा : पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणाऱ्या बांधकामविषयक ‘रचना २०१५’ या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा प्रारंभ बिल्डर्स असोसिएशन, सातारा शाखेचे अध्यक्ष रामदास जगताप यांच्या हस्ते व असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत झाले. येथील जिल्हा परिषद मैदानावर दि. १४ पासून हे प्रदर्शन भरणार आहे. रामदास जगताप म्हणाले, ‘पुणे-मुंबईच्या तोडीस तोड रचना हे प्रदर्शन बिल्डर्स असोसिएशन आयोजित करते. यंदाच्या वर्षी रचना प्रदर्शनातून बदलते सातारा, विकसित होणारे सातारा, ही सातारची ओळख संपूर्ण राज्याला या प्रदर्शनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या दिग्गजांपासून ते आपले घर हे स्वप्न बाळगणाऱ्या सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. गृहप्रकल्पांचे एकाच ठिकाणी विविध पर्याय बघण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. साताऱ्यात मध्यमवर्गीयांना आवाक्यात असणाऱ्या किमतीत सदनिका उपलब्ध आहेत. बांधकाम तंत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धती यामुळे नागरिकांना त्यांच्या राहत्या शहरात विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. मागील सात वर्षांचा अनुभवव वाढता प्रतिसाद पाहून या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सातारा व अन्य जिल्ह्यातील कंपन्या सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)गृह कर्जाचे पर्याय...या प्रदर्शनात बांधकाम प्रकल्पांबरोबरच गृहसजावट, कन्स्ट्रक्शन मशिनरी, फर्निचर, सोलर सिस्टिम, गॅस गिझर, किचन अ‍ॅक्सेसरीज यासारखे विविध आकर्षक स्टॉल बघायला मिळतील. प्रदर्शनात एकूण १०० स्टॉल्स आहेत. खवैय्यांसाठी फूड मॉलची व्यवस्था प्रदर्शनस्थळी केली आहे. गृह कर्जाचे आकर्षक पर्याय या प्रदर्शनाच्या वेळेत लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.