शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, बटाट्यासाठी शीतगृह उभारू

By admin | Updated: December 7, 2015 00:29 IST

चंद्रकांत दळवी : म्हासुर्णेत सोसायटी नूतन इमारत

पुसेसावळी : ‘सहकारी संस्थांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. सहकारात धाक दाखवून नाही तर मैत्रत्वाच्या व सहकार्यांच्या भावनेतून काम केल्यास संस्थांची प्रगती होते. म्हासुर्णे सोसायटीचा व्यापारी संकुलाचा उपक्रम अभिमानाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजलेले आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे. पुसेगावला कांदा, बटाट्यासाठी शीतगृह उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन इमारत व व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे, उपसभापती धनाजी पावशे, जितेंद्र पवार, चंद्रकांत पाटील, सुनील माने, सरपंच रोहिणी कदम, उपसरपंच अजित माने, सोसायटीचे अध्यक्ष राजाराम माने, उपाध्यक्ष दादासो सय्यद, राजेंद्र दराडे, डॉ. महेश कदम, जी. के. साळवेकर, दिलीप धरू, प्रीती काळे आदी मान्यवर उपस्थित होते.आ. घार्गे म्हणाले, ‘खटाव तालुक्यात सहकाराची सुरुवात संघर्षातून झालेली आहे. त्यातूनच तालुक्याचा विकास झाला आहे. धान्यतारण योजना व ग्रामीण गोदाम योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शीतगृहाची उभारणी करण्यात येणार आहे.’दिलीप धरू म्हणाले, ‘म्हासुर्णे सोसायटीची व्यापारी संकुल उभारणीची संकल्पना सहकार क्षेत्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. जनाधार हाच बँकेचा मोठा पुरस्कार आहे. अल्पावधीतच बँकेबरोबर, शेतीची माहिती शेतकऱ्यांना बँकेच्या पोर्टल आॅनलाईन पाहण्यास मिळेल.’मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सोसायटी सचिव उत्तम सूर्यवंशी जीडीसीए परीक्षेत राज्यात अव्वल आल्याने त्यांचा सत्कार आयुक्त दळवी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संचालक विलास शिंदे, सुनील घोरपडे, अनिल माने, संतोष घार्गे, नंदकुमार मोरे, संजय जगदाळे, हणमंत देशमुख, दादासो कदम, गोरख माने, अण्णासो माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)कागदोपत्री संस्थांची नोंदणी रद्द!सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीत सोसायटी व सचिवांचे कार्य महत्त्वाचे आहे. कागदोपत्री अस्तित्वात आहेत व प्रत्यक्षात नाहीत, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे काम सुरू केले आहे,’ अशी माहिती आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यावेळी दिली.