शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

हवालदार सचिन काळंगे अनंतात विलीन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST

अंगापूर : खडकी (पुणे) येथील बॉम्बे इंजिनि‌अरिंग ग्रुपच्या मुख्य कार्यालयात कर्तव्य बजावताना शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या वर्णे येथील ...

अंगापूर : खडकी (पुणे) येथील बॉम्बे इंजिनि‌अरिंग ग्रुपच्या मुख्य कार्यालयात कर्तव्य बजावताना शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या वर्णे येथील जवान हवालदार सचिन विष्णू काळंगे (वय ४०) यांच्या पार्थिवावर वर्णे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन काळंगे यांच्या निधनाची माहिती मिळताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यांचे पार्थिव दुपारी त्यांच्या गावी आणण्यात आले. काही काळ त्यांच्या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही शोक अनावर झाला.

दरम्यान, सैन्यदल, प्रशासन, पोलीस, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रांतील मान्यवर ग्रामस्थांच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी सोपान टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, मंडलाधिकारी संतोष झनकर, धनंजय शेडगे, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

सचिन काळंगे हे सैन्य दलाच्या बाॅम्बे इंजनिअरिंग ग्रुपमधे २००० मध्ये भरती झाले होते. तेव्हापासून त्यांनी जम्मू-काश्मीर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, इलाहाबाद, अरुणाचल प्रदेश, गुजरात तसेच तीन वर्षे राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार या पदावर सेवा बजावली होती. काळंगे यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील तब्बल २७ जणांनी भारतीय सैन्यदलात सेवा दिली आहे, देत आहेत. त्यांच्या पश्चात सैन्य दलातून निवृत्त झालेले वडील विष्णू, बंधू संदीप, पत्नी अश्विनी, बारा वर्षांचा मुलगा प्रेम, दहा वर्षांची कन्या सिद्धी असा परिवार आहे.