ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. १० - सोशल मीडियावरून अश्लिल मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले आमदार जयकुमार गोरे सातारा शहर पोलिस ठाण्यात शरण आले.
पोलिस याप्रकरणी त्यांची चौकशी करत आहेत. सातारा जिल्हा न्यायालयापाठोपाठ सोमवारी उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज ते पोलीसांना शरण आले.