शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडमध्ये इंधन दरवाढविरोधात काँग्रेसची सायकल रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

कऱ्हाड : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी कऱ्हाड येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी, कऱ्हाड ...

कऱ्हाड : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी कऱ्हाड येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडमधील कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल रॅलीची सुरुवात केली. ही रॅली पुढे येऊन दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे जाऊन भेदा चौकमार्गे शहरातील पोपटभाई शहा पेट्रोल पंपावर तिचा समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, जिल्हा काँग्रेस कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, कऱ्हाडचे माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, सतीश पाटील, शिवाजी जाधव, दिलीप देशमुख, मोहन शिंगाडे, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव, कऱ्हाड दक्षिण युवकचे अध्यक्ष अमित जाधव, कोळे ग्रामपंचायत सदस्य अभिजित चव्हाण, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘मोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले आहे, महागाईच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून महागाईचा डोंगर सामान्य जनतेसमोर उभा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना मोदी सरकार टॅक्स वाढवून ज्यादा पैसे सामान्य जनतेकडून उकळत आहे व याचे त्यांना काहीही सोयरसूतक दिसत नाही. आज इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे, यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यभर सायकल रॅली आयोजित करून निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच स्वाक्षरी मोहीमसुद्धा शहरी भागातील पेट्रोल पंपावर घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचा रोष काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे व या आंदोलनातून आमची मोदी सरकारला मागणी आहे की, इंधनाचे दर तातडीने कमी करावेत.’

फोटो आहे..

१७ कऱ्हाड

कऱ्हाड येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.