शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोयना जमीन वाटप १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

सातारा : ‘राज्यकर्ते म्हणून कोयनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे स्पष्ट करीत १५ ऑक्टोबरपर्यंत तातडीने जमीन वाटपाची प्रक्रिया ...

सातारा : ‘राज्यकर्ते म्हणून कोयनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे स्पष्ट करीत १५ ऑक्टोबरपर्यंत तातडीने जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी,’ अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच बैठकीत पुनर्वसन नियोजन आराखडा तातडीने बनविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

कोयना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सभागृहात बैठक झाली. या बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, अप्पर मुख्य प्रधान सचिव नितीन करीर, मदत पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, कॉ. संपत देसाई, चैतन्य दळवी यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते.

या बैठकीत कोयना जलाशयाच्या मागे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्या जमिनी चुकीने वन विभागाकडे वर्ग झाल्या आहेत. त्याची माहिती घेऊन तातडीने सर्व्हे करण्यात येईल. तसेच त्याचे संकलन बनवून त्यांना नव्याने पुनर्वसनासाठी पात्र ठरविले जाईल. त्याचबरोबर इको डेव्हलपमेंट कमिटी बनवून तातडीने मायक्रो प्लॅनिंग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोयना जलाशयात धरणाच्या भिंतीपासून ७ किलोमीटर अंतर सोडून मच्छिमारी आणि पर्यटनासाठी परवानगी देण्यात येईल. कोयना प्रकल्पाचे पाणी ज्या परिसरात वापरले जाते. तेथील शासकीय अनुदान घेणाऱ्या आणि सहकारी संस्थामध्ये तातडीने पाच टक्के याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची नोकरभरती करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण करावी, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

लँडपूलखाली ४५४ हेक्टर जमीन उपालब्ध असून ती प्राधान्याने कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येईल. महावितरण कोयनेची वीज वापरत आहे. त्यासाठी ज्या जमिनीवर पाणी अडविले आहे. त्यांना नोकरभरतीत प्राधान्य दिले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महेश शेलार, सचिन कदम, सीताराम पवार, प्रवीण साळुंखे, तानाजी बेबले, राजू मोरे यांच्यासह सातारा, सांगली, ठाणे, रायगडचे जिल्हाधिकारी, महसूल, वन, ऊर्जा, पर्यटन, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून सहभागी झाले होते.

\\\\\\\\\\\\\\\\\