फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना काळातील घरगुती वीज बिलात सवलत मिळणार असल्याची चर्चा असल्याने वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारांनी मीटर युनिट घेतले नाहीत. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. आता रिडींग न घेता अवाच्या सव्वा बिले आली आहेत. जून-जुलैमध्ये अंदाजे रिंडीग देऊन हजारो रुपयांची बिले दिली आहेत.
आता मार्च महिन्यात तालुक्याचे अधिकारी वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी येऊन ‘वीज बिल भरा नाही तर वीज खंडित केली जात आहे. नियमित बिले भरली आहेत. लाखो रुपये अनामत रक्कम बिनव्याजी वीज वितरण कंपनी वापरते. त्यांचाच वीज पुरवठा खंडित करून त्यांना अंधारात ठेवले जात आहे. तर अनेक वर्षांपासून स्थानिक कर्मचाऱ्यासमोर आकडे टाकून चोरून वीज वापरतात त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही.