शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजच्या ट्रॅडिशनल डे’मध्ये हुल्लडबाजांवर संक्रांत!

By admin | Updated: January 14, 2017 19:31 IST

मकरसंक्रांतीचा दिवस महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन म्हणून साजरा केला जातो. शनिवारीही क-हाडला ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा झाला.

ऑनलाईन लोकमत 
क-हाड, दि. 14 - मकरसंक्रांतीचा दिवस महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन म्हणून साजरा केला जातो. शनिवारीही क-हाडला ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा झाला. युवक-युवती नटून-थटून कॉलेज कॅम्पसमध्ये वावरले. मात्र, ज्यांचा कॉलेजशी सूतराम संबंध नाही, असे युवकही कॅम्पस परिसरात वावरत होते. अखेर पोलिसांनी दंडुका उगारल्यानंतर या टिकोजीरावांना पळता भुई थोडी झाली. पोलिसांच्या कारवाईमुळे संबंधितांवर अक्षरश: संक्रांतच ओढावली. 
 
क-हाडनजीकच्या विद्यानगरमध्ये विविध शाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या वर्षात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील महाविद्यालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, परिसरातील वाढत्या छेडछाडीच्या घटना लक्षात घेऊन महाविद्यालय व्यवस्थापनानेही सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये सध्या ओळखपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नाही. 
 
तसेच महाविद्यालयातून बाहेर पडेपर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते ओळखपत्र गळ्यातून काढता येत नाही. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ‘ड्रेस कोड’ ही तयार केला आहे. याचबरोबर महाविद्यालय परिसरात ठिकठिकाणी पोलिस ठाणे, महाविद्यालयांचे प्राचार्य, सुरक्षा समिती आदींचे नंबरही लावण्यात आले आहेत. छेडछाड किंवा हुल्लडबाजीचा प्रकार घडताच याबाबतची माहिती पोलिस किंवा प्राचार्यांना मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. 
 
महाविद्यालय व्यवस्थापनासोबत कºहाड शहर पोलिसांकडूनही या परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. शहर पोलिस ठाण्याचे निर्भया पथक या परिसरात वारंवार गस्त घालत असते. महाविद्यालय परिसरात अनेक युवक निव्वळ हुल्लडबाजी करण्याच्या उद्देशाने येत असतात. तसेच यावेळी विद्यार्थिनींची छेड काढण्याचा किंवा त्यांच्यावर शेरेबाजी करण्याचा प्रकारही घडतो. त्यामुळे अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही याठिकाणी फिरत असतात. 
 
शनिवारी पारंपरिक वेशभूषा दिन असल्याने या परिसरावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. ‘ट्रॅडिशनल डे’च्या निमित्ताने अनुचित प्रकार घडू नये, अथवा विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये, यासाठी गुन्हे प्रकटीकरण व वाहतूक शाखेचे पथक विद्यानगरमध्ये सकाळपासून तळ ठोकून होते. रस्त्याकडेला विनाकारण घुटमळणाºयांना हटकण्याबरोबरच वारंवार फेरफटका मारणाºया युवकांना जाब विचारून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली. अचानक सुरू झालेल्या या तपासणीने हुल्लडबाज युवकांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, काही युवकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद घ्यावा लागला. 
 
युवकांची तिळगूळ वाटपाची हुशारी 
पोलिसांनी ‘प्रसाद’ द्यायला सुरुवात करताच हुल्लडबाज युवक गडबडले. काहींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी एकमेकांना तिळगूळ वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला. मात्र, संबंधितांची ही हुशारी पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. पोलिसांनी काठी उगारताच संबंधित युवकांची धावाधाव सुरू झाली. वाट मिळेल त्या दिशेने युवक धावताना दिसत होते.