शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुणाचा खून; दोघाजणांना अटक

By admin | Updated: March 29, 2017 01:04 IST

महाविद्यालयीन तरुणाचा खून; दोघाजणांना अटक

पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर दोघाजणांनी मारहाण करीत महाविद्यालयीन तरुणाचा खून करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासांत दोघांना अटक केली आहे़ आशिष विभिषण पवार (वय २०, रा़ आसावरी, नांदेड सिटी) आणि आकाश अनिलकुमार डोके (२०, रा़ दामोदरनगर, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत़ गौरव रामचंद्र जाधव (२१, रा़ सिंहगड इन्स्टिट्यूट हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक, मूळ घुरसाळे, ता़ खटाव, जि़ सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़ मनोज सुभाषचंद्र चोरडिया (वय २४, रा़ नवले पुलाजवळ) आणि अभिजित शिंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये रविवारी रात्री ११ वाजता घडली़ याप्रकरणी अभिजित प्रभाकरराव शिंदे (वय २२, रा़ मधुकोष बिल्डिंग, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे़ यातील सर्वजण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून ते वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत़ गौरव जाधव, मनोज चोरडिया हे शुभम चौधरी या मित्राचा वाढदिवस साजरा करुन रात्री कॉलेजच्या कॅम्पसमधील एव्हिकेशन कॉलेजजवळच्या पायऱ्यांवर बसले होते़आशिष पवार, आकाश डोके हे आंबेगाव येथील जत्रेला जाऊन तेथे आले़ एकाने त्यांची ओळख करुन दिली़ तेव्हा गौरव जाधव याने ओळख दाखविली नाही़ त्यावरुन त्याच्यात व आशिष पवार याच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली़ आभिजित शिंदे याचा मित्र आकाश कराडकर याने दोघांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले़ मात्र, या बाचाबाचीचा राग मनात धरून आकाश डोके हातात बांबू घेऊन आला व त्याने गौरव जाधव याच्या पायावर, डोक्यावर बांबूने मारहाण केली़ आशिष पवार याने मनोज चोरडिया यालाही बांबूने मारहाण केली़ ते पाहून शिंदे हा पळत जाऊन मदतीसाठी आकाश कराडकर याला बोलवून घेऊन आला़ तेव्हा पवार याने कराडकर यालाही बांबूने मारहाण केली़ त्यानंतर ते पळून गेले़ तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचारादरम्यान सोमवारी रात्री गौरवाचा मृत्यू झाला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला़ या दोघांचा शोध घेत असताना ते मूळगावी पळून जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी थांबले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांना मिळाली़ तेथे जाऊन पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली़ गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात पोलिसांनी यश मिळविले़ या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले़ सरकारी वकिलांनी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने दोघांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़