शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

युतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

आनंदराव पाटील : जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत टीकास्त्र

सातारा : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी शासनाने घेतलेल्या राबविलेल्या योजनांची नावे बदलून मोदी व फडणवीस सरकारने देशातील व महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला असून, युती सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका आमदार आनंदराव पाटील यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युती शासनाच्या कारभाराविरोधात शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, महाप्रदेश महिला काँगे्रस सरचिटणीस रजनी पवार, बाबासाहेब कदम, प्रमोद देशमाने, प्रल्हाद चव्हाण, मोहन भोसले, साहेबराव जाधव, राजाराम काळे, शिवाजीराव फडतरे, अशोकराव पाटील, भगवानराव आवाडे, नरेश देसाई, विजय भिलारे, धैर्यशील सुपले, रवींद्र झुटिंग, उमेश ताटे, राहुल घाडगे, डॉ. शंकरराव पवार, जितेंद्र भोसले, जयकुमार शिंदे, अमित जाधव, नंदकुमार निकम, सर्जेराव जांभाळे, जिल्हा महिला काँगे्रसच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, कोरेगाव महिला काँगे्रसच्या अध्यक्षा संजना जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. आनंदराव पाटील म्हणाले, ‘या देशातील जनतेने मोठ्या अपेक्षेने मोदी-फडणवीस सरकारला निवडून दिले; परंतु केंद्रात व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन सहा महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी, थेट भरीव आर्थिक मदत, ऊसदराची समस्या आदी गंभीर प्रश्न आदी विषयांवर मोदी फडणवीस सरकारने जनतेचा मोठा विश्वासघात केला आहे. अशा दगाबाज सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.’ ैअसेही पाटील म्हणाले. रवींद्र झुटिंग यांनी स्वागत केले. धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ताटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)