शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शहरातील कचरा बनतोय डोकेदुखी

By admin | Updated: October 26, 2014 23:30 IST

सातारकर हैराण : दीपावलीतच साचला शहरातील रस्त्यांवर शेकडो टन कचरा--निवडणूक झाली आता कामाचं बोला

सातारा : दीपावलीचा उत्सव चारच दिवसांत संपला आणि शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा येऊन साचला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शेकडो टन कचरा येऊन पडला आहे. यामध्ये फटाक्यांचे कागद आणि प्लास्टिकचा समावेश आहे. त्यातच गेले दोन सातारा शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असल्यामुळे गारवा जाणवू लागल्याने सातारकर चांगलेच हैराण झाले असतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी साचून राहिलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. दीपावलीनिमित्त साताऱ्यातील अनेक रस्ते गेले काही दिवस गर्दीने फुलले होते. याच काळात अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर दुकानेही टाकली होती. या कालावधीत झालेला कचरा अजूनही दूर झालेला नाही. तो तसाच रस्त्यावर पडून राहिल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून येणारे-जाणारे पादचारी मात्र नाकाला रुमाल लावूनच जात आहेत.यशवंतराव चव्हाण यांचा पोवई नाक्यावर पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच नेहमी कचरा टाकला जातो. या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे सातारा नगरपालिका कधी गांभीर्याने पाहत असल्याचे ऐकिवात नाही. दीपावलीच्या कालावधीत अनेक फूल विक्रेते येथे बसतात; मात्र तेही येथेच कचरा करून जातात. पालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार या मंडळींना सूचना केल्यानंतरही कोणत्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत. बसस्थानक परिसरालगतच सकाळी सहा ते नऊ या वेळेत मंडई भरते. येथे ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल विकण्यासाठी येतात. ताजा भाजीपाला मिळत असल्याचे सातारकरांची येथे खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, अनेक शेतकरी मंडईची वेळ संपली की राहिलेला खराब माल आणि उर्वरित कचरा बाजूलाच उचलून टाकतात. मात्र, याचा सर्वात मोठा फटका बसस्थानक येणाऱ्या प्रवाशांना बसतो कारण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. (प्रतिनिधी)