शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाचा कांदा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

औषधी फवारणीने बळीराजा बेजार लोकमत न्यूज नेटवर्क पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन ...

औषधी फवारणीने बळीराजा बेजार

लोकमत न्यूज नेटवर्क

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून कधी कडक ऊन, तर कधी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कांदा पिकावर करपा, तसेच होपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे वारंवार औषध फवारणी करावी लागत असल्याने औषधांच्या वाढत्या खर्चाने शेतकरी बेजार झाले आहेत.

वारंवार फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने पळशी परिसरात अनेकांचे कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. रोगामुळे कांद्याच्या पाती वाकड्या होऊन पिवळ्या पडल्या आहेत. कांद्याची वाढ थांबून पीक जळू लागले आहे. मूळकुज होत असल्याने कांदा पीक शेतातच सडत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बरेच शेतकरी नुकसान टाळण्यासाठी अर्धवट वाढलेले कांदे काढून घेण्यासाठी लगबग करीत आहेत. सध्या हजार ते बाराशेदरम्यान दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही पदरात पडत नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मागील वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रति क्विंटल चार ते साडेचार हजारपर्यंत भाव होता; पण सप्टेंबरपर्यंत सलग व जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच जणांचा कांदा शेतातच सडून गेला, तर अनेकांचा कांदा उगवलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदाच नव्हता अशी परिस्थिती होती. यावर्षीही शेतात तयार झालेला कांदा रोगाला बळी पडल्याने उत्पादन कमालीचे घटणार आहे. साठवलेला चाळीतील कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर काढला असला तरी दर नसल्याने मिळेल त्या भावात विक्री करीत आहेत.

कांदा हेच या परिसरातील नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकातून मिळालेला पैसा पुढच्या पिकात भांडवल म्हणून वापराला जातो; पण या हंगामात ‘कधी अस्मानी, तर कधी सुलतानी’ संकटाने खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. कांद्याला किमान तीन ते चार हजार दर मिळावा अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया

वातावरण सारखे बदलत असल्याने कांद्यावर रोग पडत आहे. फवारणी करूनही औषधींची मात्रा लागू होत नसल्याने पीक हाती येईल की नाही याची काळजी वाटते.

दत्तू जळक, शेतकरी, पळशी

फोटो

पळशी, ता. माण परिसरात बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर रोग पडून पिकाचे नुकसान झाले आहे.