सैदापूर येथील समाजभूषण बाबूराव गोखले ग्रंथालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे, नजमा तांबोळी, सूर्यकांत अडसुळे, रेश्मा कसबे, सीमा कांबळे आदी उपस्थित होते.
सुरेखा सूर्यवंशी म्हणाल्या, रूढी-परंपरांच्या साखळदंडात अडकलेल्या स्त्रीच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. सावित्रीबाईंनी अंधश्रद्धांना प्रखर विरोध करून महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले.
यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल रुक्साना नदाफ यांनी आभार मानले.
फोटो : ०६केआरडी०४
कॅप्शन : सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे समाजभूषण बाबूराव गोखले ग्रंथालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुरेखा सूर्यवंशी, दादाराम साळुंखे, नजमा तांबोळी उपस्थित होत्या.