शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिसला चौक...टाक भाजी मंडई !

By admin | Updated: June 13, 2015 00:28 IST

नोकरदारांचा वेळ हेरून व्यवसाय : चौकाचौकांमध्ये भरू लागलीय भाजी मंडई

दत्ता यादव - सातारा--दिवसेंदिवस शहराचा विस्तार अगदी झपाट्याने वाढत आहे. पूर्वी एखादी छोटी वस्तू घ्यायची म्हटली तरी उपनगरातील नागरिकांना शहरात यावे लागत होते; परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या गरजा ओळखून अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय थाटले. त्यापैकीच एक म्हणजे रोजच्या जेवणातील भाजी होय. शहरातील चौकाचौकांमध्ये सध्या भाजी मंडई भरली असल्याचे दिसून येत आहे. नोकरदारांचा वेळ आणि भाजी विक्रीतून होणारी उलाढाल मोठी असल्यामुळे सध्या भाजी विक्री व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. त्यामुळे अगदी शहराच्या उपनगरातही सकाळ आणि संध्याकाळ भाजी मंडईतील किलबील ऐकायला मिळत आहे. शहरामध्ये प्रामुख्याने तीन भाजी मंडई आहेत. रविवार पेठ, महात्मा फुले,आणि जुना मोटार स्टॅन्ड भाजी मंडईचा त्यामध्ये समावेश आहे. या मंडईमध्ये खरेदीसाठी विशेषत: रविवार आणि गुरुवारी गर्दी होते. त्यामुळे इतर दिवशी या मंडई अक्षरश: ओस पडतात. त्यामुळे केवळ दोनच दिवस व्यवसाय होत असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांनी शहर व उपनगरातील मुख्य चौकाचे ठिकाण हेरले. चौकाच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यात भाजी विक्रीस बसलो तर चांगला व्यवसाय होणार, हे माहीत असलेल्या विक्रेत्यांनी शहरातील असा कोणताच चौक सोडला नाही. मोळाचा ओढा, राधिका टॉकिज, बसस्थानक परिसर, समर्थ मंदिर, सीटी पोस्ट कार्यालय, पोवई नाका, गोडोली नाका, भूविकास बँक, जुना आरटीओ कार्यालय, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी सध्या भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने भाजी विक्रीकडे पर्यायी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. शहरात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा उपनगरात मिळणाऱ्या भाज्यांचे दरही दुपटीने असतात. पंचवीस रुपये किलो दराने मिळणारे कांदे उपगनराच्या चौकातील भाजीमंडईत ३५ ते ४० रुपये किलोने विकले जात आहेत. उपगनरात राहणारा बहुतांशवेळा कामगार वर्ग असतो. सायंकाळी कामावरून आल्यानंतर शहरात जाण्यापेक्षा जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.जागेवरून वादावादीचे प्रसंगकाही ठिकाणी चौकात भाजी विक्रीस बसण्यावरून अनेकदा विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. स्थानिक नगरसेवक किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरून चौकामध्ये जागा मिळविली जाते. एखादा नवखा विक्रेता त्या ठिकाणी आल्यास त्याला हुसकावून लावले जाते. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीला चौकामध्ये भाजी विक्रीस जागा मिळते.शहारातील मंडईमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही. तेथे सगळी वशिलेबाजी आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शहराच्या बाहेरील चौकात भाजी विक्रीला बसावे लागत आहे. येथेही आम्ही जी काही पालिकेची रोजची पावती आहे, त्याची रक्कम भरतो. या ठिकाणी तरी आम्हाला सुखाने व्यवसाय करू द्या, अशी आमची अपेक्षा आहे.- संपत गायकवाड (भाजी विक्रेता, मोळाचा ओढा)वाहतुकीची कोंडी नित्याचीचचौकाचौकांमध्ये भाजी मंडई भरू लागल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. काहीवेळेला छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मंडई विक्रीस धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांना बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. मात्र, ज्या त्या परिसरातील नागरिकांनी आपापल्या चौकातील सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.