शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तीचा धाक दाखवून युवकाकडून हिसकावल्या चैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST

सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघालेल्या तरुणाला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना ...

सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघालेल्या तरुणाला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी विशाल ऊर्फ शुभम विश्‍वास यादव (रा. शिवथर, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दि. ३ रोजी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास यादव हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या २० ते २२ वर्षीय वयोगटातील दोघांनी त्याला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील एक लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चेन जबरदस्तीने चोरून पळ काढला. यावेळी यादव, त्याचा मित्र प्रणव साबळे यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने प्रणवच्या तोंडावर गुप्तीचा वार करून त्याला जखमी केले. तर यादवच्या दोन्ही हातांवर वार करून त्यालाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करत आहेत.