शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डे हवेलीतील कोरोनाची साखळी तुटता तुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:40 IST

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेलीत एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने औषधोपचार सुरू आहेत‌. ...

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेलीत एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने औषधोपचार सुरू आहेत‌. पंधरा दिवसांपासून गावातील युवक आणि युवा मंचचे कार्यकर्ते कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, त्याला यश येत नाही.

कोपर्डे हवेली हे जिल्हा परिषद गटातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

रुग्ण वाढत असल्याने गावातील युवकांनी अनेक प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये रुग्णांची टेस्ट करून कोरोना सेंटरमध्ये दाखल करणे, काही लोकांच्या जेवणाचे डबे पोहोच करणे,

गृहविलगीकरणातील रुग्णांना घरी जाऊन भेटणे, गावातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचा सल्ला घेणे, गावातील डॉक्टर बाहेरगावी असले तरी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन देणे‌. आहाराविषयी माहिती देणे आदी मार्गदर्शन केले जात आहे.

सध्या गावात सुमारे २० ते २५ रुग्ण घरी उपचार घेत आहेत, तर काही कोरोना सेंटर व खासगी दवाखान्यांत उपचार सुरू आहेत. एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाने पाच ते सहा लोकांचे बळी घेतले आहेत.

त्यासाठी गावातील युवक कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याला हवे तसे यश मिळत नाही.

चौकट....

अंगावर आजार काढल्याने अनेकांना संसर्ग होत आहे. वेळेत उपचार घेतले जात नाहीत. विलगीकरणाची मुदत संपण्यापूर्वीच घरातील लोकांशी संपर्क येत आहेत. जनता कर्फ्यू असूनही रुग्ण कमी झाले नाहीत. दवाखान्याचा खर्च परवडणारा नसल्याने मदत करताना मर्यादा येत आहेत. आता खरी गरज आहे, ती लसीकरणाची. जास्तीतजास्त लसीकरण होणे गरजेचे आहे.

दररोज रात्री, दिवसा केलेल्या कामांची माहिती ऑनलाइन मीटिंगद्वारे घेतली जाते.