शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ल्स’ विरोधातील तक्रारींचे ‘शतक’

By admin | Updated: December 14, 2014 23:47 IST

स्थानिक गुन्हे शाखा : तक्रारी दाखल करण्याचा आज अंतिम दिवस

सातारा : ‘पीएसीएल’ तथा ‘पर्ल्स’च्या विरोधात गेल्या पाच दिवसांत शंभरहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेत तक्रारी दाखल करून घेण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचा सोमवार, दि. १५ डिसेंबर शेवटचा दिवस आहे. दरम्यान, वारंवार तक्रारीचा ओघ वाढत असल्यामुळे तक्रारीसाठी आणखी मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेत दाखल झालेल्या तक्रारी या एमपीएडी अ‍ॅक्टच्या अनुषंगाने दाखल करण्यात येत असून, येथे दाखल झालेल्या तक्रारी साठहून अधिक आहेत. येथे लहुबा विठ्ठल शितोळे (रा. जरेवाडी, ता. कोरेगाव), संतोष रामचंद्र सपकाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण), शंकर पांडुरंग शिंदे (रा. मसूर, ता. कऱ्हाड), प्रेमा बळीराम माळवे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), योगीराज रामचंद्र वारले (रा. मरळी, ता. कऱ्हाड), आनंद दिलीप सावंत (रा. विठ्ठलकृपा कॉलनी, संगमनगर, सातारा) सूरज कोंडिबा सपकाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण), आशा सतीश फरांदे (रा. शनिवार पेठ, सातारा), विठ्ठल दगडू सपकाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण), अशोक बापूसाहेब पवार (रा. भवानी पेठ, सातारा), आनंदा गेणू साबळे (रा. वडूथ, ता. सातारा), अक्षय राजकुमार गांधी (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव), वसंत गणपत सणस (रा. आरडे, ता. जावळी), दत्तात्रय हणमंत माने (रा. कोडोली, सातारा), किशोर विजय जाधव (रा. संभाजीनगर) यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या लोकांनी गुंतवलेली रक्कम ११ लाख इतकी असून, त्यांना परतावा होणारी रक्कम २८.३९ लाख इतकी आहे. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेत चार दिवसांत साठहून अधिक तर शाहूपुरी पोलीस ठाण्या चाळीसहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे दाखल झालेल्या तक्रारींचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे करत आहेत. (प्रतिनिधी)पाच जणांवर गुन्हेफसवणूक झालेल्या ठेवीदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संचालक लोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, बराखांबा रोड, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांच्यासह एजंट, कार्यालय व्यवस्थापक सोनावणे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.