शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सिमेंट बंधारे चौकशी समितीला ‘दिरंगाईची गळती’

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

भ्रष्टाचाराचा पाणलोट : गौडबंगाल कायम; अधिकारी म्हणतात हा विषय राज्य शासनाचा..!

सातारा : दुष्काळी तालुक्यात झालेल्या साखळी सिमेंट बंधाऱ्यातील गुणनिंयत्रण चाचणी चौकशी अहवालाला ‘दिरंगाईची गळती’ लागली आहे. हा चौकशी अहवाल कधी येणार, याविषयी कृषी विभागातील अधिकारी ठामपणे बोलायला तयार नाहीत. जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांनी हा विषय आता आमच्या अखत्यारित राहिला नसल्याचे सांगत त्यांनी राज्य शासनाकडे बोट केले आहे. परिणामी या चौकशी अहवालाचे गौडबंगाल आहे तरी काय, याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाणलोट विकास एक हजार कोटीहून अधिक रुपयांचा आहे. यापैकी माण आणि खटाव तालुक्यातच सर्वाधिक कामे झाली आहेत. उर्वरित तालुक्यात कामे जरी झाली असलीतरी तेथील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अजूनही तितक्याशा चर्चेत आलेल्या नाहीत. माण आणि खटाव तालुक्यातील साखळी सिमेंट बंधारे मात्र चांगलेच चर्चेत आले आहेत. या बंधाऱ्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामेही निकृष्ट झाल्याची तक्रार होती. या कामांचे गुणनियंत्रण करावे, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीने उपोषण केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. याचवेळी ही समिती दहा दिवसांत आपला अहवाल देणार असेही कृषी अधीक्षक कार्यालयाने सांगितले होते.मात्र, महिना झाला तरी साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील भ्रष्टाचार आणि गुणनियंत्रण चाचणी चौकशीचा अहवाल पूर्ण झालेला नाही. हा अहवाल कधी येणार आणि पूर्ण होणार याची माहिती कृषी अधीक्षक कार्यालयालाही नाही. कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. हा विषय आता राज्याचा बनल्याचे त्यांनी सांगितले आणि साखळी सिमेंट बंधारे त्याचबरोबर पाणलोटची कामे उत्कृष्ट झाल्याचाही दावा केला. (प्रतिनिधी)