मायणी : येथील श्री संत सेना महाराज नाभिक संघटनेच्यावतीने हिंदू धर्मीयांचा पवित्र सण नागपंचमी हा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळी अकरा वाजता नागोबाच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येथील हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये, तर दुसऱ्या चांदीच्या नागोबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री धनगर विठोबा मंदिरामध्ये करण्यात आली.
यावर्षी येथील नाभिक समाज बांधव गावातील प्रत्येक घरी जाऊन नागोबाची चिखलाची मूर्ती देत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घरोघरी नागोबाची चिखलाची मूर्ती न देण्याचा निर्णय घेतला होता, तसेच मंदिरामध्ये प्रवेश न देता लांबूनच भाविक नागोबाच्या मूर्तीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता दोन्ही ठिकाणी बसविलेल्या नागोबाच्या चिखलांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
१३मायणी
मायणीत नागपंचमी उत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा झाला. ( छाया : संदीप कुंभार)